गुहागर, 12 मे : रत्नागिरी जिल्ह्यात मुंबईतून परतणारे लोंढे काही थांबायचं नाव घेत नाही. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आज जिल्ह्यात कोरोनामुळे आणखी एका रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनामुळे मृतांची संख्या आता 3 वर पोहोचली आहे.
गुहागर तालुक्यातील जामसुदमधील एका 65 वर्षीय व्यक्तीचा रविवारी मृत्यू झाला. या रुग्णाची कोरोना चाचणी करण्यात घेण्यात आली होती. त्यानंतर आज या व्यक्तीचा रिपोर्ट हा कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला. या व्यक्तीच्या रिपोर्ट पॉझिटिव्ह आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या लोकांची यादी तयार करण्यात आली असून पुढील प्रक्रिया सुरू आहे.
हेही वाचा - 2 महिलांचं भाडणं झाल्यानंतर पुरुषही उतरले मैदानात, हाणामारीचा VIDEO समोर
मुंबईतून कोकणात मोठ्या प्रमाणावर लोकं परत येत असल्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असल्याचं समोर आलं आहे. रत्नागिरीत आज सकाळी आणखी पाच जणांचे नमुने पॉझिटिव्ह आले असून जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या 52 वर पोहोचली आहे. सोमवारी आढळलेल्या पाच पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये तीन रत्नागिरी शहरातले असल्यामुळे रत्नागिरीचा काही भाग सील करण्यात आला आहे.
तसंच लांजा तालुक्यातल्या नउ आणि दहा वर्षाच्या अशा दोन लहान मुलानाही कोरोनाची लागण झाली आहे तर लांजा तालुक्यातल्या 9 आणि 10 वर्षाच्या दोन मुलांचा समावेश आहे. त्यामुळे शहरातही कोरोनाचा प्रवेश झाल्यामुळे काही परिसर सील करण्यात आले आहेत.
हेही वाचा - 9 महिन्यांची गरोदर नर्स करतेय 6 तास काम, आराम सोडून सुरू आहे रुग्णांची सेवा
तर दुसरीकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यातही वाशीतून आलेल्या एका महिलेचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे सिंधुदुर्गची रुग्णसंख्या आता पाच झाली आहे. एकीकडे असे रुग्ण वाढत असताना मुंबईहून कोकणात येणाऱ्याना क्वारंटाइन करुन आवश्यक त्यांच्या चाचण्या घेण्यासाठी आधीच अपुरी क्षमता असलेल्या प्रशासनावर प्रचंड ताण पडू लागला आहे.
दापोलीत आणखी 3 रुग्ण आढळले
तर दुसरीकडे दापोली तालुक्यात पुन्हा तीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. भोपण, कोळबांद्रे आणि कळकी या गावातील तिन रूग्णांचा रिपोर्ट कोरोना पाॅझिटिव्ह आला आहे. या सगळ्यांना नवभारत छात्रालय येथे क्वारंटाइन केले होते व नंतर घरी पाठविण्यात आले आहे. त्यानंतर रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.