चोरट्यांच्या दिवाळीमुळे बॅंक ऑफ महाराष्ट्राला फटका, चोरीचा फंडा वाचून व्हाल थक्क

चोरट्यांच्या दिवाळीमुळे बॅंक ऑफ महाराष्ट्राला फटका, चोरीचा फंडा वाचून व्हाल थक्क

आज एक आगळी-वेगळी दिवाळी पहाट पहायला मिळाली. ती म्हणजे चोरट्यांची दिवाळी पहाट.

  • Share this:

विजय कमळे पाटील, प्रतिनिधी

जालना, 29 ऑक्टोबर : सध्या सर्वत्र दिवाळी निमित्ताने दिवाळी पहाट कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं आहे. जालन्यात मात्र, आज एक आगळी-वेगळी दिवाळी पहाट पहायला मिळाली. ती म्हणजे चोरट्यांची दिवाळी पहाट. हो अगदी बरोबर ऐकलात तुम्ही चोरट्यांचीच दिवाळी पहाट. त्याचं झालं असं की जालना शहरात चोरट्यांनी दिवाळी पहाटेला चक्क बँक ऑफ महाराष्ट्रचं एटीएमच पळवलं.

शहरातील नूतन वसाहत भागात ही घटना घडली आहे. काल मध्यरात्री ते आज पहाटे दरम्यान ही घटना घडली. नूतन वसाहत भागात बँक ऑफ महाराष्ट्रचे दोन एटीएम आहेत. यापैकी एक एटीएम चोरट्यांनी पळून नेलं असून दुसऱ्या एटीएमचं मोठं नुकसान केलं आहे. चोरट्यांनी पळून नेलेल्या एटीएममध्ये नेमकी किती रक्कम होती याची माहिती कळू शकली नाही. मात्र, या घटनेमुळे महाराष्ट्र बँकेचं जरी दिवाळ निघणार असलं तरी चोरट्यांची मात्र दिवाळी पहाटचं साजरी होणारय हे मात्र नक्की.

दरम्यान, एकीकडे बँकेसंदर्भात आता ग्राहकांची चिंता वाढत चालली आहे. ऐन दिवाळीत डोंबिवलीच्या गुडविन ज्वेलर्सला कुलूप लागलं आहे. मागील सहा दिवसांपासून कोणतंही कारण न देता हे दुकान बंद करण्यात आलंय. डोंबिवली पूर्वेच्या मानपाडा रोडवर गुडविन ज्वेलर्स आहे. या ज्वेलर्समध्ये डोंबिवलीकरांनी भिशी योजना, फिक्स डिपॉझिट या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली होती.

21 तारखेला हे दुकान दोन दिवसांसाठी बंद ठेवण्यात येणार असल्याची सूचना दुकानाबाहेर लावत हे दुकान बंद करण्यात आलं. मात्र, त्यानंतर सहा दिवस उलटूनही हे दुकान सुरू झालेलं नाही. त्यामुळं गुंतवणूकदार हवालदिल झाले असून त्यांनी दुकानाबाहेर गर्दी केली आहे. यापूर्वीही डोंबिवलीतील प्रथमेश ज्वेलर्स अशाचप्रकारे बंद करण्यात आलं होतं, त्यातही कोट्यवधी रुपये अडकले होते. सध्या पीएमसी घोटाळा गाजत असून त्यानंतर आता गुडविन ज्वेलर्सकडूनही अशीच फसवणूक होते का? अशा विवंचनेत गुंतवणूकदार सापडले आहेत.

इतर बातम्या - लेकीसमान सुनेवर सासऱ्याकडून बलात्कार, घटना समजताच सासूने कापली हाताची नस!

Close for stock take ची नोटीस

Close for stock take ची नोटीस लावून ऐन दिवाळीत गुडविन ज्वेलर्सच्या दुकांनांना टाळं लागल्यानं गुडविन ज्वेलर्सच्या लाखो ग्राहंकांना मोठा झटका लागलाय. ठाण्यात गडकरी रंगायतन येथील दुकान देखील बंद आहे. ठाणे, कल्याण, डोंबिवली एवढच नाही तर देशभरातील सर्वच गुडविन ज्वेलर्सच्या दुकानांना टाळं लागल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे कोट्यावधी रुपयांच्या मोठा घोटाळा झालाय की काय, अशी शंका उपस्थित केली जात आहे.

इतर बातम्या - 1 नोव्हेंबरपासून लागू होणार नवे नियम, जाणून घ्या नाहीतर होऊ शकतं मोठं नुकसान

दिवाळाच्या तोंडावर गेली 3 दिवस ठाणे जिल्ह्यातील गुडविन ज्वेलर्सची दुकाने बंद आहेत. शेवटी आज दुकानावर close for stock take ची नोटीस लावली याची माहिती गुडविन ज्वेलर्सच्या ग्राहकांना कळताच ग्राहकांनी सर्वच गुडविन ज्वेलर्स दुकाना बाहेर मोठी गर्दी करायला सुरुवात केली. कारण फक्त सोनं विक्री एवढेच व्यवहार या गुडविन ज्वेलर्समध्ये चालत नव्हते तर, कोट्यावधी रुपयांची भिशी, मासिक हप्त्यांवर सोनं, सोना हिऱ्यांत गुंतवणूक असे विविध व्यवहारांमुळे लाखो ग्राहक या गुडविन ज्वेलर्सशी जोडले गेले होते. पण आता हे दुकानाला टाळं लागल्याने गुडविनचे ग्राहकांमध्ये भितीचे वातावरण आहे. तर याबाबत गुडविन ज्वेलर्सशी संपर्क साधला, असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

इतर बातम्या - युतीच्या फॉर्म्युल्यावरून शिवसेनेची आक्रमक भूमिका, निवडणार दुसरा पर्याय?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 29, 2019 12:08 PM IST

ताज्या बातम्या