चोरी फत्ते झाल्याच्या आनंदात चोर नाचत-नाचत गेला, डान्स CCTVमध्ये कैद

चोरी फत्ते झाल्याच्या आनंदात चोर नाचत-नाचत गेला, डान्स CCTVमध्ये कैद

काम फत्ते झाल्यानंतर नाचणारे अनेक असतात पण चोरी फत्ते झाल्यानंतर चोर सुद्धा नाचतो. हा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

  • Share this:

बीड, 14 जुलै : चोरी दरोड्याच्या अनेक बातम्या आपण पाहिल्या असतील, ऐकल्या असतील पण ही जरा हटके बातमी आहे. काम फत्ते झाल्यानंतर नाचणारे अनेक असतात पण चोरी फत्ते झाल्यानंतर चोर सुद्धा नाचतो. हा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. दोन दिवसांपूर्वी बीड शहरातील जालना रोड लगत राहणारे होलसेल व्यापारी महावीर मुथा यांच्या घराशेजारील गोडावूनमधून 6 लाख 90 हजार रुपये किंमतीचा सिगारेट लंपाल करण्यात आला होता. यामध्ये व्हील्स, गोल्डफ्लक, ब्रिस्टॉल या ब्रँडच्या पाकिटांची चोरी झाल्याचं उघड झालं होतं.

या क्लिष्ट गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी अक्षरशः रात्रीचा दिवस करून तपास केला. यात 21 वर्षीय बिलाल अब्दुल रज्जाक याला अटक केली. पोलिसांचा मार पडताच बिलालने चोरी कशी केली याचा पाढा वाचला. 11 तारखेला पहाटे 4 वाजताच्या सुमारास 6 लाख 90 हजार किमतीचा सिगारेटचा मुद्देमाल चोरीला गेला अशी तक्रार शिवाजी नगर पोलिस स्टेशनला दिली होती. याबाबती पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी विशेष पथकाची नेमणूक केली.

या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी दरोडा प्रतिबंधक पथकाचे पोलीस निरीक्षक गजानन जाधव यांच्याकडे तपास देण्यात आला. त्यानी सूत्रं हालवून अवघ्या 48 तासात मुद्दे मालासह आरोपीला बेडय़ा ठोकल्या आहे. या कामगिरीमुळे पोलीस दलाचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.

ज्या होलसेल व्यापाऱ्याकडून तो सिगारेटचा माल घेवून जायचा त्या दुकानातील माल चोरी करण्याचा प्लान तयार करण्यात आला होता. गोडावूनची खोटी चावी बनवली. शेजाऱ्यांच्या गाडीची चावी चोरी केली. सराईत चोराप्रमाणे मास्क, हात मोजे, येवढंच नाही तर सीसीटीव्हीपासून बचाव करण्यासाठी छत्रीचा वापर केला. अन् गोडावूनमधील 7 लाखांचा मुद्देमाल लंपास केला. यावेळी एकाही पुरवा आरोपीनं सोडला नव्हता.

हेही वाचा : नराधम दिराकडून लहान भावाच्या बायकोवर बलात्कार, मुंबईजवळील घटनेनं खळबळ

संशयीत म्हणून नजर ठेवताना, फोन कोलमधील संभाषणाचा पुरावा मिळाला. अन् गुन्ह्याची उकल झाली. बीड शहरातील बुंदेलपुरा भागात राहणाऱ्या 21 वर्षीय पानटपरी चालक बिलालने ही चोरी केल्याचं उघड झालं. चोरीचा मुद्देमाल गेवराई येथील राहत्या घरातून जप्त केला. आश्चर्य या गोष्टीचं की चोरी केलेले बॉक्स गाडीमध्ये ठेवल्यानंतर चक्क चोरी फत्ते झाल्याचा आनंद व्यक्त करताना बिलालने डान्स केला. यावेळी शेजारच्या सीसीटीव्हीमध्ये हे कैद झालं.

चोरी यशस्वी झाली म्हणून नाचणारा बिलाल सध्या जेलची हवा खातो. या गुन्ह्यात त्यांच्याकडून 10 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर पोलीस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

माकड आणि मांजराच्या धमालमस्तीचा VIDEO व्हायरल

Tags: Robbery
First Published: Jul 14, 2019 08:27 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading