S M L

खरं बोलल्यामुळेच दाभोलकर,पानसरे आणि कलबुर्गींची हत्या - गुलजार

डॉ. नरेंद्र दाभोळकर, कॉम्रेड गोविंद पानसरे, कलबुर्गी हे गप्प न राहता बोलत होते. ते कटु होतं पण सत्य होतं. ते बोलत असल्यानेच त्यांची हत्या झाली.

Ajay Kautikwar | Updated On: Jun 21, 2018 05:50 PM IST

खरं बोलल्यामुळेच दाभोलकर,पानसरे आणि कलबुर्गींची हत्या - गुलजार

मुंबई,ता, 21 जून : डॉ. नरेंद्र दाभोळकर, कॉम्रेड गोविंद पानसरे, कलबुर्गी हे गप्प न राहता बोलत होते. ते कटु होतं पण सत्य होतं. ते बोलत असल्यानेच त्यांची हत्या झाली असं मत ज्येष्ठ गीतकार गुलजार यांनी व्यक्त केलं. 'द वॉल'च्या अर्घ्य दत्ता यांना दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे सडेतोड मत व्यक्त केलं.

समाजात सत्य बोलणं हे कुणालाच आवडत नाही. प्रत्येक काळात समाजाला आरसा दाखवणाऱ्या अशा विद्वानांना विरोध पत्करावा लागतो, त्यांची किंमत चुकवावी लागते. या तीघांच्याही वाट्याला ते आलं असंही गुलजार म्हणाले.

समाजातील वाईट चालिरिती, कुप्रथा, अंधश्रद्धा यांच्या विरोधात या लोकांनी आवाज उठवला होता.

प्रवाशांना विमानातून हकलवण्यासाठी एअर एशियाच्या पायलटनं एसी केला जोरात

अमेरिकेचा आरोग्यखर्च कमी करण्याची जबाबदारी भारतीय डॉक्टरवर!

Loading...

लोकांनी विवेकानं वागावं असं त्यांनी सांगितलं पण काही लोकांना ते रूचलं नाही आणि त्यांची हत्या झाली ही संपूर्ण समाजासाठीच अतिशय दुर्दैवी आहे.अंधश्रध्दा निर्मुलनासाठी झाटणाऱ्या डॉ. नरेंद्र दाभोळकरांची 20 ऑगस्ट 2013 ला हत्या करण्यात आली. कॉम्रेड गोविंद पानसरे यांची 16 फेब्रुवारी 2015 ला हत्या करण्यात आली होती.

मराठी रंगभूमीवरचा अजरामर सुपरस्टार मोठ्या पडद्यावर!

वीरप्पनचा खात्मा करणारा अधिकारी 'मिशन काश्मीर'साठी नियुक्त !

पाच,सहा वर्षानंतरही जर या प्रकरणातले मारेकरी सापडत नसल्याबद्दलही त्यांनी दु:ख व्यक्त केलं. पश्चिम बंगालमध्ये बुद्धिजिवी वर्ग हा समाजातल्या घटनांवर कायम प्रतिक्रिया देत असतो. व्यक्त होत असतो. वृत्तपत्रही त्याच्या मतांची आदर करत त्याला योग्य स्थान देतात, त्यामुळं विचारवंत सक्रिय आहेत हे लोकांना माहित होतं. पण महाराष्ट्रात दुर्दैवानं असं झालं नाही. असं झालं असतं तर विचारवंतांच्या हत्या झाल्याच नसत्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 21, 2018 05:49 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close