राज्यसभा सदस्यपदी आता सचिन आणि रेखा नाहीत; या चार जणांची नियुक्ती!

राज्यसभा सदस्यपदी आता सचिन आणि रेखा नाहीत; या चार जणांची नियुक्ती!

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, अभिनेत्री रेखा, अनू आगा आणि के. पराशरन यांची कारकिर्द संपल्याने नव्या सदस्यांची राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली आहे.

  • Share this:

दिल्ली, ता. 14 जुलै : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी अन्य चार जणांना राज्यसभेचे सदस्य म्हणून नियुक्त केले आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, अभिनेत्री रेखा, अनू आगा आणि के. पराशरन यांची कारकिर्द संपल्याने नव्या सदस्यांची राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विचारक आणि सोशल मीडियाप्रमुख राकेश सिन्हा यांच्यासह कामगार नेते राम शकल, मूर्तीकार रघुनाथ महापात्रा आणि प्रसिद्ध नृत्यांगणा सोनल मानसिंह यांची राज्यसभेवर वर्णी लागली आहे.

इंग्लंडने जिंकला टॉस, फलंदाजीचा निर्णय

स्कूल बसच्या चाकाखाली चिरडून 3 वर्षाच्या मुलाचा मृत्यू

संविधानाने राष्ट्रपतींना २४५ सदस्य संख्या असलेल्या राज्यसभेतील 12 सदस्य नियुक्त करण्याचे अधिकार दिले आहेत. पूर्व नियुक्त मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, अभिनेत्री रेखा, अनू आगा आणि के. पराशरन यांची कारकिर्द संपल्याने नव्या सदस्यांची राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विचारक आणि सोशल मीडियाप्रमुख राकेश सिन्हा यांच्यासह कामगार नेते राम शकल, मूर्तीकार रघुनाथ महापात्रा आणि प्रसिद्ध नृत्यांगणा सोनल मानसिंह यांची राज्यसभेवर वर्णी लागली आहे.

पत्नीला पास करण्यासाठी अजब शक्कल, कॉलेज संचालकाने प्राध्यापकाकडूनच सोडवले पेपर

मंदिराच्या बांधकामाला सुरूवात करू - अमित शहा

राज्यसभेवर नियुक्त करण्यात आलेले सदस्य राकेश सिन्हा हे संघाचे विचारक म्हणून ओळखले जातात. ते संघाचे मीडिया आणि सोशल मीडिया प्रमुखही आहेत. ते वृत्तवाहिन्यांवर संघ आणि भाजपची बाजू जोरकसपणे मांडत असतात. त्यांनी संघाचे संस्थापक केशव बळीराम हेडगेवार यांचं आत्मचरित्रही लिहिलं असून 'राजनीतिक पत्रकारिता' या लोकप्रिय पुस्तकाचे ते लेखक आहेत.

आहे फक्त एकच हात पण लगावतो जबरदस्त षटकार !

ही आहे जगातली सगळ्यात लांब बाईक, वजन आहे 450 किलो

तर सोनल मानसिंह या प्रसिद्ध नृत्यांगणा असून त्यांना या आधीच पद्म विभूषण, पद्म भूषण आणि संगीत नाटक अकादमी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेलं आहे. रघुनाथ महापात्रा हे ओडिशातील प्रसिद्ध मूर्तीकार आहेत. त्यांनाही पद्मश्री, पद्म भूषण आणि पद्म विभूषण पुरस्कारांनी गौरविण्यात आलेलं आहे. तर राम शकल हे प्रसिद्ध कामगार नेते आहेत. ते भाजपचे माजी खासदार असून यूपीच्या रॉबर्टगंज मतदारसंघातून ते तीन वेळा निवडून आले होते. अभिनेत्री रेखा, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, अनू आगा आणि के. पराशरन यांची कारकिर्द संपल्याने नव्या सदस्यांची राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 14, 2018 03:21 PM IST

ताज्या बातम्या