शुटिंगवेळी या 5 अभिनेत्यांचा झालेला अपघात, विकीला तर पडले 13 टाके

आज बॉलिवूडचा स्टार विकी कौशल त्याचा ३१ वा वाढदिवस साजरा करत आहे. १६ मे १९८८ मध्ये मुंबईत विकीचा जन्म झाला.

  • Share this:

आज बॉलिवूडचा स्टार विकी कौशल त्याचा ३१ वा वाढदिवस साजरा करत आहे. १६ मे १९८८ मध्ये मुंबईत विकीचा जन्म झाला. त्याने २०१२ मध्ये लव शव ते चिकन खुराना या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या वर्षी आलेल्या उरी- द सर्जिकल स्ट्राइक या सिनेमाने त्याला एका रात्रीत स्टार केलं. काही दिवसांपूर्वी एका सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान, विकी कौशलचा अपघात झाला. यात त्याला गंभीर दुखापत झाली होती.

सेटवर अपघात होणाऱ्या अभिनेत्यांमध्ये सर्वात पहिलं नाव येतं ते बॉलिवूडचा ‘बादशहा’ शाहरुख खानचं. २०१० मध्ये ‘दुल्हा मिल गया’ या सिनेमात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत तो दिसला होता. पण एक सीन करताना त्याच्या खांद्याला गंभीर दुखापत झाली. आजही त्याची ही दुखापत पूर्ण बरी झाली नसून अनेकदा त्याचा खांदा दुखतो.

दुसरं नाव येतं ते ‘दबंग’ सलमान खानचं. ‘वॉन्टेड’ सिनेमाच्या चित्रीकरणावेळी एक स्टंट सीन करताना सलमानला दुखापत झाली होती. काही दिवस सिनेमाचं चित्रीकरण थांबवण्यात आलं होतं. २००९ मध्ये प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर तुफान गल्ला कमावला होता.

बॉलिवूडचा सुपरहिरो ऋतिक रोशनचाही सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान अपघात झाला होता. २०१२ मध्ये ‘अग्निपथ’ सिनेमाच्यावेळी स्टंट सीन शूट करताना त्याला गंभीर दुखापत झाली होती.

‘राउडी राठोड’ सिनेमाच्या चित्रीकरणावेळी अक्षय कुमारला इजा झाली होती. या अपघातामुळे त्याचा खांदा दुखावला गेला होता. काही दिवस सिनेमाचं चित्रीकरण थांबवण्यात आलं होतं. अभिनेता आणि कोरिओग्राफर प्रभुदेवाने हा सिनेमा दिग्दर्शित केला होता.

रणवीर सिंगला बॉलिवूडचा नवा सुपरहिरो म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. त्याच्या ९ वर्षांच्या फिल्मी करिअरमध्ये त्याला असं काही स्टारडम मिळालं जे मिळवण्यासाठी बॉलिवूडच्या तीनही खानला १० वर्षांहून अधिक काळ लागला होता. रणवीरचा अपघात स्टंट सीन शूट करताना नाही तर डान्स शूट करताना झाला होता. ‘गुंडे’ सिनेमाच्या वेळी डान्स सीन शूट करताना तो पडला आणि त्याला दुखापत झाली होती.

विकी कौशल गुजरातमध्ये भयपटाचं चित्रीकरण करत असताना त्याचा अपघात झाला. भानुप्रताप सिंगच्या आयुष्यावर बेतलेल्या सिनेमाचं चित्रीकरण करत असताना त्याच्यावर दरवाजा पडला. या अपघातात त्याच्या चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली. त्याला त्वरीत जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी जबड्याला फ्रॅक्चर झाल्याचं म्हटलं होतं. विकीला १३ टाकेही घालण्यात आले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 16, 2019 10:30 AM IST

ताज्या बातम्या