एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचं 'या पाच' गोष्टींवरून होतं स्पष्ट

26 फेब्रुवारीला भारतानं एअर स्ट्राईक केल्यानंतर आता अनेकांनी पुरावे मागायला सुरूवात केली आहे. काही जण आंतरराष्ट्रीय मीडियाचा देखील हवाला देत आहेत. पण, आत्तापर्यंतच्या काही घडामोडींकडे नीट पाहता दहशतवाद्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं मान्य करावं लागेल.

  • Share this:

जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरचा भाऊ अम्मार याची एक ऑडिओ क्लिप आता समोर आली आहे. ज्यामध्ये त्यानं तळांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचं मान्य केलं आहे. शिवाय, या क्लिपमध्ये तो दहशतवाद्यांची मोठ्या प्रमाणावर भरती झाली होती. त्यांना ट्रेनिंग दिली जात होती ही गोष्ट देखील मान्य करतोय.

या हल्ल्यानंतर फर्स्ट पोस्टनं देखील एक रिपोर्ट दिला होता. ज्यामध्ये फ्रेंचेस्का मैरिनो या फ्रेंच पत्रकारानं प्रत्यक्षरित्या पाहिलेला अनुभव सांगण्यात आला आहे. शिवाय, स्थानिक लोकांनी देखील घटनास्थळी काही अॅम्ब्युलन्स पाहिल्या. ज्यामधून जवळपास 35 मृतदेह नेण्यात येत होते. शिवाय, पाकिस्तानी लष्करानं स्थानिकांचे मोबाईल देखील काढून घेतले.

वायुदल प्रमुख बी.एस. धनोआ यांनी देखील पत्रकार परिषद घेत आम्ही आमचं काम केलं. मृतदेह मोजणं सरकारचं काम असल्याचं म्हटलं. शिवाय, काही नुकसान झालं नाही तर पाकिस्ताननं प्रतिसाद का दिला? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.

एअर स्ट्राईकनंतर सिंथेटिक अॅपर्चर रडार (एसएआर)नं घेतलेले फोटो देखील आता समोर आले आहेत ज्यामध्ये दहशतवाद्यांच्या तळाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचं स्पष्ट दिसून येत आहे.

भारतीय वायु दलानं केलेल्या हल्ल्याची माहिती सर्वप्रथम पाकिस्तानच्या सैन्य अधिकाऱ्यांनी ट्विटरवर दिली. शिवाय, पाकिस्तानी मीडियानं देखील हल्ल्यानंतरचे काही फोटो दाखवले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 5, 2019 08:49 AM IST

ताज्या बातम्या