राजधानी दिल्लीत होणार दहशतवादी हल्ला, गुप्तहेर यंत्रणेच्या माहितीनंतर हाय अलर्ट

राजधानी दिल्लीत होणार दहशतवादी हल्ला, गुप्तहेर यंत्रणेच्या माहितीनंतर हाय अलर्ट

जम्मू काश्मीरच्या मुद्द्यावरून 15 ऑगस्टला संपूर्ण दिल्लीमध्ये कडेकोट सुरक्षा तैनात करण्यात आली होती. तशीच सुरक्षा अद्यापही पाहायला मिळत आहे.

  • Share this:

प्रशांत लीली रामदास, प्रतिनिधी

नवी दिल्ली, 20 ऑगस्ट : राजधानी दिल्लीमध्ये दहशतवादी हल्ला होणार असल्याची माहिती गुप्तहेर खात्याकडून देण्यात आली आहे. शासकीय गाडीचा उपयोग करून दहशतवादी हल्ला करण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे संपूर्ण दिल्लीमध्ये मोठी सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. दिल्लीमध्ये सुरक्षा वाढविण्यात आली असून बॅरिकेड लावून वाहनांची तपासणी केली जात आहे.

जम्मू काश्मीरच्या मुद्द्यावरून 15 ऑगस्टला संपूर्ण दिल्लीमध्ये कडेकोट सुरक्षा तैनात करण्यात आली होती. तशीच सुरक्षा अद्यापही पाहायला मिळत आहे. 3 अफगाणी

दहशतवाद्यांनी भारतात घुसखोरी केली आहे. तेच दिल्लीतल्या महत्त्वाच्या ठिकाणी हल्ला करणार असल्याची माहिती गुप्तहेर यंत्रणांकडून देण्यात आली आहे. शासकीय वाहनांचा वापर करून दिल्लीमधल्या व्हीआयपी परिसरात, शासकीय वसाहतींमध्ये हल्ला घडवून आणण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

सोमवारी गुप्तहेर यंत्रणांकडून यासंबंधी अलर्ट देण्यात आला. त्यानंतर संपूर्ण दिल्ली आणि सीमा भागांमध्ये मोठी सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर दिल्लीला किल्ल्यांचं स्वरुप आलं आहे. दरम्यान, भारतात घुसखोरी केलेल्या 3 अफगाणी दहशवाद्यांसारख्या दिसणाऱ्यांचा शोध घेण्याचं काम पोलीस यंत्रणेकडून सुरू आहे.

'बालकोट हल्ल्यानंतर पाकिस्तानला घरात घुसून उद्ध्वस्त करण्यासाठी भारतीय लष्कर तयार'

बालाकोट हवाई(Balakot Airstrike)हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या हद्दीत घुसून युद्ध करण्यासाठी भारतील लष्कर आता सज्ज असल्याचं लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी म्हटलं आहे. पाकिस्तानशी कोणत्याही पद्धतीचं युद्ध करण्यासाठी लष्कर तयार असल्याचं त्यांनी सरकारच्या प्रमुखांना स्पष्ट सांगितलं आहे. पाकिस्तानकडून करण्यात येणाऱ्या कोणत्याही हल्ल्याला उत्तर देण्यासाठी भारतीय लष्कर तयार आहे अशी माहिती सैन्याच्या वरिष्ठांकडून देण्यात आली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय लष्कर आता पाकिस्तानसोबत युद्ध करण्यासाठी तयार आहे. अगदी पाकिस्तानच्या हद्दीत घुसून त्यांचा तळ उद्ध्वस्त करण्याची तयारी आता भारतीय लष्कराने दाखवली आहे. पुलवामा दहशतवादी हल्ला झाल्यानंतर सरकार आता हवाई हल्ल्यांसाठी वेगवेगळ्या शस्त्रांचा वापर करत आहे. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. आम्ही शस्त्रांसह आता कोण्याताही हल्लाला उत्तर देण्यासाठी सज्ज असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

इतर बातम्या - जोड्यानं हाणलं पाहिजे, गिरीश महाजनांवर टीका करताना धनंजय मुंडेंची जीभ घसरली

'पाकिस्तानी सीमेत घुसून युद्ध करण्यासाठी भारतीय लष्कर तयार'

जनरल रावत हे सेवानिवृत्त होणार आहेत. जाण्याआधी त्यांनी लष्करातील अधिकाऱ्यांशी एका बंद खोलीत चर्चा केली. आता आपण युद्धासाठी तयार आहोत. अगदी पाकिस्तानची सीमा ओलांडून त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी आपण सज्ज असल्याचं त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितलं. 2016 मध्ये झालेल्या उरी हल्ल्यानंतर आता भारतीय लष्कर कोणत्याही युद्धासाठी सज्ज आहे.

बालाकोट हल्ल्यावेळी भारत-पाकिस्तानमध्ये गरमा-गरमी

पुलवामा हल्ल्यानंतर त्याला उत्तर देण्यासाठी भारतीय वायूदलाने 26 फेब्रुवारीला पाकिस्तानच्या सीमेवर बालाकोटजवळ जैश-ए-मोहम्मदच्या सगळ्यात मोठ्या दहशवादी प्रशिक्षण केंद्रावर हल्ला चढवला होता. त्यानंतर पाकिस्तानने आक्रमक होत हल्ल्याचं प्रत्युत्तर देण्यासाठी भारतील लष्कराच्या तळांना लक्ष केलं होतं. पण त्यांचा प्रयत्न भारतीय लष्कराने हाणून पाडला.

VIDEO: इस्रोने रचला नवा इतिहास; 7 सप्टेंबरला 'चंद्रयान-2' चंद्रावर उतरणार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 20, 2019 11:19 AM IST

ताज्या बातम्या