'दररोज पक्षप्रवेशाचा कार्यक्रम असेल, भाजपमधील अनेक नेते संपर्कात'; नाथाभाऊंचा सूचक इशारा

'दररोज पक्षप्रवेशाचा कार्यक्रम असेल, भाजपमधील अनेक नेते संपर्कात'; नाथाभाऊंचा सूचक इशारा

' माझ्या डोक्यावरच टेन्शन कमी झालं. आता इतरांना टेन्शन देण्याच काम करणार'

  • Share this:

नाशिक, 24 ऑक्टोबर : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी काल राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केल्याने भाजपला मोठा धक्का बसला आहे. पक्षप्रवेशादरम्यान खडसेंनी त्यांना पक्षात दिल्या जाणाऱ्या वागणुकीबद्दल निराशा व्यक्त केली. आज नाशिक येथे माध्यमांशी बोलताना त्यांनी सूचक इशारा दिला आहे. 'दररोज पक्षप्रवेशाचा कार्यक्रम असेल, भाजपमधील अनेक नेते संपर्कात' असल्याचा सूचक इशारा खडसेंनी दिला आहे.

यावेळी ते म्हणाले की, माझ्या राष्ट्रवादीच्या प्रवेशानंतर महाराष्ट्रभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सर्वांनीच उत्स्फूर्तपणे स्वागत केलं आहे. भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीत प्रवेश करायचा आहे. मात्र चिन्हावर निवडणूक आलेल्यांना थोडी वाट पाहावी लागेल. काही वेळापूर्वीच देवेंद्र फडणवीसांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर आले होते. खडसेंनी फडणवीसांना कोरोनातून लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. दिल्लीतील अनेकांशी चर्चा केली होती, मात्र त्याचा काही परिणाम झाला नाही, राष्ट्रवादीत प्रवेशाचे निश्चित झाल्याची भावना खडसेंनी व्यक्त केली होती.

हे ही वाचा-अपक्ष आमदार गीता जैन यांचा शिवसेनेत प्रवेश; राज्यात भाजपला आणखी एक झटका

पक्षप्रवेशादरम्यान त्यांनी ईडी आणि सीडीचा उल्लेख केला होता. लवकरच याबाबत सर्व काही कळेल असेही ते म्हणाले. खडसे पुढे म्हणाले की, चंद्रकांत पाटील हे कुल्फी आणि चॉकलेट देऊन भाजपात प्रवेश देतात. तर दुसरीकडे भाजपातले अनेक आमदार संपर्कात आहेत. मात्र पक्ष बंदी कायद्यामुळे अनेकांना अडचणी आहेत. दुसरीकडे त्यांना राष्ट्रवादीत काय पद मिळणार यावरही त्यांनी मत व्यक्त केलं आहे, ते म्हणाले की,  साधा कार्यकर्ता म्हणून मला काम करायला मला आवडेल. तर बोदवड उपसा सिंचन योजनेचा प्रकल्प मंजूर आहे. मागच्या 4 वर्षांपासून मी भीतीच्या छाये खाली होतो. आता निर्दोष सुटलो आहे. यामुळे माझ्या डोक्यावरच टेन्शन कमी झालं. आता इतरांना टेन्शन देण्याच काम करणार असे म्हणत त्यांना भाजपला सूचक इशारा दिला आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: October 24, 2020, 3:41 PM IST

ताज्या बातम्या