'...तर महाविकासआघाडी सरकार 5 वर्ष टिकणार नाही'

'...तर महाविकासआघाडी सरकार 5 वर्ष टिकणार नाही'

"मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरे मधील मेट्रो कारशेडला तात्काळ स्थगिती दिली. नाणार आंदोलकावरील गुन्हे मागे घेतले"

  • Share this:

विरेंद्र उत्पात, प्रतिनिधी

पंढरपूर, 03 डिसेंबर : 'देवेंद्र फडणवीस यांनी कशीबशी पाच वर्ष काढली. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी केली नाही तर हे सरकार स्थापन पाच वर्ष टिकणार नाही', असं भाकित  शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी वर्तवलं आहे. ते पंढरपूरमध्ये बोलत होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरे मधील मेट्रो कारशेडला तात्काळ स्थगिती दिली. नाणार आंदोलकावरील गुन्हे मागे घेतले. हे निर्णय मुख्यमंत्री ठाकरे यांनी ज्या वेगाने घेतले त्याच पद्धतीने शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीचा निर्णय त्यांनी घ्यावा, अभ्यास करतोय, माहिती घेतो. अस सांगत राहिले तर त्याचं सरकार पाच वर्ष टिकणार नसल्याचा इशारा पाटील यांनी दिला.

काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेने आपल्या जाहिरनाम्यात शेतकरी कर्जमाफीबाबत आश्वासन दिलं होतं. आता त्यांना सत्तेत बसण्याची संधी सुद्धा मिळाली आहे. शेतकरी संघटना १२ डिसेंबरपर्यंत संपूर्ण कर्जमाफी करा अन्यथा सरकार विरोधात आंदोलन करावं लागेल, असा इशाराही रघुनाथ पाटील यांनी दिला.

दरम्यान,  महाविकासआघाडीने सरकार स्थापन केल्यानंतर कामाचा धडाका लावला आहे. आज  राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि जयंत पाटील हजर होते. राज्यासाठी लवकरच महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार आहे. यासाठी उद्या महत्त्वाची बैठक बोलवण्यात आली आहे.

राज्यावर ६ लाख ७१ हजार कोटी कर्ज

त्याआधी राज्यावर तब्बल ६ लाख ७१ हजार कोटीपेक्षा जास्त कर्ज आहे. क्षमतेपेक्षा अधिक कर्ज घेतलं का? पायाभूत प्रकल्पांसाठी योग्य व्याजदरानं कर्ज घेतलं का, याचा अभ्यास केला जाईल, असं पाटील यांनी स्पष्ट केलं. तसंच  जे प्रकल्प योग्य नाहीत ते थांबवले जातील, विनाकारण प्रकल्प थांबवले जाणार नाहीत, असंही पाटील यांनी सांगितलं.

मंत्र्यांना दालन वाटप

दरम्यान, महाविकास आघाडीतील मंत्र्यांसाठी मंत्रालयात  दालन वाटप केले. आज दालन वाटप करताना सीएम यांच्या जवळील सहा मजलावरील  मुख्य इमारतीतील  दुसर मोठे आणि महत्त्वाचे दालन कोणास ही दिले नाही. त्याचे वाटप केलेल नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ खडसे, नंतर भाऊसाहेब फुंडकर हे वापरत असलेले दालन आता रिक्तच ठेवले आहे. हे दालन मुख्यमंत्री दालनानंतर सर्वात मोठे दालन, नव्याने सहा मंत्री शपथ धेतलेल्या पैकी कुणालाही दिलेले नाही. नवीन शपथविधीत हे रिक्त दालन कोणाला मिळणार का याकडे सर्वांचं  लक्ष लागलं आहे.

कोकणातल्या आंदोलकांना दिलासा

नाणार प्रकरणी दाखल झालेले गुन्हे आता मागे घेण्यात येणार असल्यानं कोकणातल्या आंदोलकांना दिलासा मिळाला आहे. कोकणात हा प्रकल्प होऊ नये यासाठी शिवसेनेनेही आंदोलनात उडी घेतली होती. त्यानंतर हा प्रकल्प रायगडला हलविण्यात येणार असल्याची घोषणाही त्यावेळचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. या प्रकल्पामुळे पर्यावरणाला हानी पोहोचू शकते असं वाटल्याने स्थानिक नागरिकांनी या प्रकल्पाला तीव्र विरोध केला होता.

First published: December 3, 2019, 7:19 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading