मराठा आंदोलनात परप्रांतीयांकडून हिंसाचार,राज ठाकरेंचा आरोप

मराठा आंदोलनात परप्रांतीयांकडून हिंसाचार,राज ठाकरेंचा आरोप

'मराठा आंदोलनात ७५०० मराठी मुलांवर ३०७ चे गुन्हे दाखल झाले आहे. एका बाजूनं पेटवायचं दुसऱ्या बाजूनं गुन्हे टाकून त्यांचे आयुष्य बरबाद करायचं'

  • Share this:

नवी मुंबई, 05 आॅगस्ट :  सरकारने मराठा आरक्षणाकडे दुर्लक्ष केल्यामुळे आंदोलन पेटले. मराठा आंदोलनात ७५०० मराठी मुलांवर ३०७ चे गुन्हे दाखल झाले आहे. एका बाजूनं पेटवायचं दुसऱ्या बाजूनं गुन्हे टाकून त्यांचे आयुष्य बरबाद करायचं आता अशा मुलांना नोकऱ्या मिळू शकत नाही. मराठा आंदोलनात बाहेरची मुलं येऊन इथं हिंसा करतायत. ज्यांचा महाराष्ट्राशी संबंध नाही ते हिंसा करतायत असा आरोप मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. तसंच भाजपचे अध्यक्ष अमित शहा हे नरेंद्र मोदी यांनी बसवलेला माणूस आहे अशी टीकाही त्यांनी केली.

नवी मुंबई मनसेच्या कामगार संघटनेचा मेळावा पार पडलाय या मेळाव्यात राज ठाकरे यांची चौफेर तोफ धडाडली. कर्मचारी तुम्ही कार्यालयात असतात आणि बाहेर सर्वसामान्य नागरिक असतात, ती जबाबदारी तुम्ही कार्यालयात पार पाडली पाहिजे. नाहीतर सगळं विकलं गेलंच आहे. इतर अनेक संघटना आहेत त्या करतायत ते मला माहिती नाही

मनपाचे अनेक भूखंड आत्तापर्यंत अनेक बिल्डरांना विकले गेलेत त्यावेळेस तुम्ही काय केलं ? जिकडे मनपा आहेत तिथं सगळी हाताबाहेर प्रकरणं गेली आहेत अशी टीका राज ठाकरेंनी केली.

जर कमी जागेत गणपती बसल्याचे असतील तर कपाटात बसवतो.मग हवाय कशाला सार्वजनिक गणेशोत्सव ज्याप्रकारे हिंदू सणांवर गदा आणली जात मग सगळ्या धर्मांना लागू झालं पाहिजे. मग रस्त्यावरचे नमाज बंद झाले पाहिजेत मशिदीवरचे भोंगे बंद झाले पाहिजेत अशी मागणीही राज ठाकरेंनी केली.

नोटबंदीनंतर साडेतीन कोटी नोकऱ्या गेल्यात. ही आकडेवारी तुमच्यापर्यंत पोहोचू दिल्या जात नाहीत. मुळात कोणीही कठोर निर्णय घेत नाहीये. तुम्ही पहारेकरी व्हा, मोदींसारखे पहारेकरी होऊ नका अशी टीकाही राज ठाकरेंनी केली.

अमित शहाच्या चेहऱ्यावरची गुर्मी पाहा, मुळात हा मोदीनं बसवलेला माणूस आहे. सहकारी बँका पाहा, अमित शहांचा बँकेत किती पैसे जमा झाले ? याची माहिती समोर आली पाहिजे अशी मागणीही राज ठाकरेंनी केली.

राज ठाकरे यांच्या भाषणातील मुद्दे

- महाराष्ट्रात मराठा समाजासहित अनेक समाज आरक्षण मागताहेत

- टाईम्स आॅफ इंडियाची बातमी - सरकारनं २४ लाख जागा भरलेल्या नाहीत

- १० लाख शिक्षकांच्या जागा रिकाम्या

- ५ लाख ४० हजार जागा रिकाम्या आहेत

-  २ लाख २० हजार अंगणवाडी सेविका, १ लाख १० हजार आरोग्य सेविकांच्या जागा भरलेल्या नाहीत

- सरकारकडे पैसे नाहीत,तरीदेखील करोडो कोटींच्या घोषणा करायच्या आहेत

- प्रत्येक राजकीय पक्ष राजकारण एके राजकारण करतोय

- मराठा आंदोलनात ७५०० मराठी मुलांवर ३०७ चे गुन्हे दाखल झालेत

- एका बाजूनं पेटवायचं दुस-या बाजूनं गुन्हे टाकून त्यांचे आयुष्य बरबाद करायचं

- अशा मुलांना नोक-या मिळू शकत नाही

- बाहेरची मुलं येऊन इथं हिंसा करतायत ज्यांचा महाराष्ट्राशी संबंध नाही ते हिंसा करतायंत पण बदनाम तुम्ही होतायत

- महाराष्ट्र आंदोलन बदनाम होणार नाही हे पण पाहिलं पाहिजे

 - कुठे आहेत नोकऱ्या? कुठे आहेत नोकऱ्या? सगळ्या नोक-या खासगी क्षेत्रात आहे

- सगळ्या गोष्टी नीट सुरु होत्या, ज्या नव्हत्या त्या चालू करण्याऐवजी योगा करत बसले

- नोटबंदीनंतर साडेतीन कोटी नोकऱ्या गेल्यात

- ही आकडेवारी तुमच्यापर्यंत पोहोचू दिल्या जात नाहीत

- कोणीही कठोर निर्णय घेत नाहीये

- तुम्ही पहारेकरी व्हा, मोदींसारखे पहारेकरी होऊ नका

- महाराष्ट्र आणि देश एका विचित्र परिस्थितीतून जातोय

- महाराष्ट्रात बांग्लादेशी पसरलेले आहेत, मोहल्ले उभे राहिले आहेत

- या लोकांना झोपडपट्टीत वसवले जातंय

- मग एसआरए उभी केल्या जातायत मग ही माणसं पुन्हा दुसरीकडे जातात

- आपल्याला कल्पना नाही आपण कोणत्या सुरुंगावर बसलो आहोत ते

- कमी जागेत गणपती बसल्याचे असतील तर कपाटात बसवतो ना

- मग हवाय कशाला सार्वजनिक गणेशोत्सव

- मग सगळ्या धर्मांना लागू झालं पाहिजे

- मग रस्त्यावरचे नमाज बंद झाले पाहिजेत मशीदीवरचे भोंगे बंद झाले पाहिजेत

- जे काँग्रेसच्या काळात घडतंय ते भाजपच्या काळात घडतंय

- हव्या नको त्या गोष्टी कोर्टाकडून हे सरकार करुन घेतंय

- कोर्ट असेल किंवा निवडणूक आयोग तुम्ही तुमचं अस्तित्व टीकवा सरकारच्या नादी लागू नका

- हे सरकार चॅनल बंद पाडली जातायंत, प्रक्षेपण थांबवलं जातंय

- अमित शहाच्या चेहऱ्यावरची गुर्मी पाहा, मुळात हा मोदीनं बसवलेला माणूस आहे.

- सहकारी बँका पाहा, अमित शहांचा बँकेत किती पैसे जमा झाले ?

- देशात हिप्नाॅटिझमचे प्रयोग सुरू आहेत

- विसरुन विसरुन जा असं सांगण्याचा प्रयत्न

- जसजशा निवडणुका येतीस तसतसं मागच्या गोष्टी मी उकरुन काढेन

First published: August 5, 2018, 7:05 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading