मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

'...तर मी उद्याच राजीनामा देतो'; मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरुन छत्रपती संभाजीराजे उद्विग्न

'...तर मी उद्याच राजीनामा देतो'; मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरुन छत्रपती संभाजीराजे उद्विग्न

सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर पुढे काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. सुप्रीम कोर्टाने निर्णयामध्ये आरक्षण बहाल करण्याचा अधिकार राज्याला नसल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर केंद्र सरकारनं यासाठी पुढाकार घ्यावा अशी विनंती राज्य सरकारच्या वतीने राज्यपालांच्या मार्फत करण्यात आली आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Meenal Gangurde

सोलापूर, 24 मे : मराठा आरक्षण (maratha reservation) सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यामुळे मराठा समाज आता आक्रमक झाला आहे. राज्यभरात मराठा संघटना बैठका घेऊन रणनीती आखली जात आहे. दरम्यान छत्रपती संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणासंदर्भात उद्विग्न प्रतिक्रिया दिली आहे. 'माझ्या राजीनाम्याने मराठा आरक्षाणाचा प्रश्न सुटणार असेल तर मी उद्याच राजीनामा देतो', अशा शब्दात त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर त्यांनी राज्य दौरा सुरू केला आहे. 28 मे रोजी ते मुंबईत येऊन मुख्यमंत्री, विरोधीपक्षनेते यांच्यासोबत एकत्रित बैठक करणार आहेत. कोणत्याही सरकारविरोधात किंवा पक्षाविरोधात हा दौरा नाही असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. यापुढे ते म्हणाले की, ओबीसी समाजाचे ज्येष्ठ लोक भेटले त्यांनी मला चांगला मार्ग सांगितला. मराठा समाजाची दिशाभूल होऊ नये यासाठी दौरा करत आहे. अनेक्षर भाषांतरीत झाली नाहीत त्यामुळे हा फटका बसला. लोकांना काय वाटतेय यापेक्षा कायदा काय आहे हे पाहणे गरजेचे आहे. त्याचा अभ्यास करण्यासाठीच मी हा दौरा सुरु केला आहे. राज्य आणि केंद्र सरकारने काय भूमिका घ्यायची ते पहावे लागेल. सारथी संस्थेची दुरावस्था किंवा वसतिगृहाचे प्रश्न प्रलंबित आहेत, त्याचे काम राज्याने करावे. माझी भूमिका पक्षाची नाही तर समाजाची आहे.

हे ही वाचा-मुख्यमंत्र्यांप्रमाणेच ठाकरे पुत्रानेही वापरला तोच शब्द; भाजपवर केली कडवट टीका

पुढे ते म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, सप्टेंबर 2020 पुर्वीच्या नियुक्त्या राज्य सरकारने कराव्यात. घराण्याचा वंशज म्हणून समाजाचा घटक म्हणून मी भूमिका घेत आहे. भारताच्या इतिहासात संसदेत पहिल्यांदा आंदोलन करणारा मी पहिला खासदार आहे, असंही ते यावेळी म्हणाले.

दरम्यान, सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर पुढे काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. सुप्रीम कोर्टाने निर्णयामध्ये आरक्षण बहाल करण्याचा अधिकार राज्याला नसल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर केंद्र सरकारनं यासाठी पुढाकार घ्यावा अशी विनंती राज्य सरकारच्या वतीने राज्यपालांच्या मार्फत करण्यात आली आहे.

First published:

Tags: Maratha reservation, संभाजीराजे