चोराचा प्रामाणिकपणा, दागिने परत करून मागितली माफी

चोराचा प्रामाणिकपणा, दागिने परत करून मागितली माफी

घटनेच्या दोन दिवसानंतर चोराला आपल्या चोरीचा पश्चाताप झाला. त्याने या कुटुंबाला चोरीचे दागिने परत केले आणि एक पत्रही लिहिलं.

  • Share this:

केरळ, 13 जुलै : चोर काय चोरी करेल याचा नेम नाही...पण तोच चोर जर चोरी झालेला मुद्देमाल तुम्हाला परत आणून दिला तर...होय हा चमत्कार घडलाय केरळमधील अंबालापुझामध्ये...एवढंच नाहीतर या चोराने दागिने तर आणून दिलेच पण माफीही मागितली.

माथेफिरू तरुण म्हणतो,आम्ही एकमेकांवाचून राहू शकत नाही !

तकाजही पंचायत परिसरात मंगळवारी एक कुटुंब आपल्या नातेवाईकाकडे गेले होते. हीच संधी साधून चोराने घराचा मागचा दरवाजा तोडून घरात घुसला. त्याने कपाट फोडून सोन्याची अंगठी, कानातले आणि एक लाॅकेट लंपास केले होते.

महाराष्ट्राच्या भूगोलाला गुजरातची पाने? राष्ट्रवादीचा हल्लाबोल

जेव्हा हे कुटुंब घरी परतले तेव्हा त्यांना घरात चोरी झाल्याचं कळलं आणि त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. घटनेच्या दोन दिवसानंतर चोराला आपल्या चोरीचा पश्चाताप झाला. त्याने या कुटुंबाला चोरीचे दागिने परत केले आणि एक पत्रही लिहिलं.  मी तुमची माफी मागतोय,माझी परिस्थिती हालाखीची होती म्हणून मी चोरी केली पण मला अटक करू नका अशी विनंतीही त्याने केली. पोलिसांनीही या प्रकरणी दागिने परत केल्यामुळे कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही.

First published: July 13, 2018, 7:12 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading