'मी उद्याचा सूर्य पाहणार नाही', सेल्फी व्हिडिओ रेकाॅर्डकरून तरुणाने संपवले आयुष्य!

'मी उद्याचा सूर्य पाहणार नाही', सेल्फी व्हिडिओ रेकाॅर्डकरून तरुणाने संपवले आयुष्य!

कल्याणमध्ये एका तरुणाने रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली.

  • Share this:

प्रदीप भणगे, प्रतिनिधी

कल्याण, 07 डिसेंबर : कल्याणमध्ये एका तरुणाने रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली. रोहित परदेशी असं या तरुणाचं नाव आहे. धक्कादायक म्हणजे, आत्महत्येपूर्वी रोहितने सेल्फी व्हिडिओ रेकाॅर्ड केला होता. व्हिडिओ रेकाॅर्ड केल्यानंतर कल्याण पत्री पुलाजवळ रेल्वे मार्गावर त्याचा मृतदेह आढळून आला.

रोहित याने आत्महत्येच्या पूर्वी मोबाईलमध्ये स्वत:चा व्हिडिओ तयार केला होता. या व्हिडिओमध्ये रोहित म्हणतो, "माझ्या भावाशिवाय या जगात कुणी नाही. त्यामुळे माझी मालमत्ता माझ्या भावाला द्यावी. आत्महत्येविषयी कोणाला जबाबदार धरू नये. मी काढलेला हा व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागता कामा नये. मी आजची रात्र पूर्णपणे जागा राहणार आहे. उद्याचा सूर्य मी पाहणार नाही."

आज सकाळी रोहितचा मृतदेह कल्याण जवळील पत्रीपुलाजवळ रेल्वे मार्गादरम्यान मिळून आला. त्याच्याकडील मोबाईल जप्त केला. त्याच्या मोबाईलमध्ये हा व्हिडिओ आढळून आला. रोहितने नेमकी कोणत्या कारणावरुन आत्महत्या केली हे अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही. परंतु, या व्हिडिओमध्ये त्यांना आपल्या आत्महत्येला कुणीही जबाबदार नाही असं सांगितलं. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे. सेल्फी व्हिडिओ रेकाॅर्ड करून रोहितने आत्महत्या केली. हा व्हिडिओ दाखवून कुणालाही प्रवृत्त करण्याचा आमचा मुळीच हेतू नाही असं आम्ही स्पष्ट करू इच्छितो.

===================================

First published: December 7, 2018, 5:16 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading