मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /गर्लफ्रेंडला पळवून नेण्यासाठी आला होता तरुण; घरी पोहोचताच तिच्या आईलाही सोबत गेला घेऊन

गर्लफ्रेंडला पळवून नेण्यासाठी आला होता तरुण; घरी पोहोचताच तिच्या आईलाही सोबत गेला घेऊन

तरुण तयारीनिशी आला होता, त्याने प्रेयसीच्या आईला पाहिलं आणि...

तरुण तयारीनिशी आला होता, त्याने प्रेयसीच्या आईला पाहिलं आणि...

तरुण तयारीनिशी आला होता, त्याने प्रेयसीच्या आईला पाहिलं आणि...

रांची, 11 जानेवारी : झारखंडची (Jharkhand) राजधानी रांचीमध्ये एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. येथे एक तरुण आपल्या अल्पवयीन गर्लफ्रेंडला पळवून नेण्यासाठी आला होता. मात्र सोबतच तो तिच्या आईलाही घेऊन गेल्याची विचित्र बाब घडली आहे. त्यानंतर मात्र पोलिसांनी तरुणाला पकडलं आणि कारही ताब्यात घेतली. आता मुलीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या जबाबानुसार आरोपी चंदन आणि कार ड्रायव्हर रंजन कुमार यांच्यावर प्राथमिक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बिहारवरुन तयारी करुन रांचीला पोहोचला

पोलिसांनी सांगितलं की, तरुण बिहारमधील नालंदा जिल्ह्यातील कतरी सराय पोलीस ठाणे हद्दीत राहणारा आहे आणि संपूर्ण तयारीनिशी तो तरुणीला पळवून नेण्यासाठी तेथे आला होता. तेथे त्याने भाड्याच्या कारने आपल्या प्रेयसीला घेऊन जाण्यासाठी झारखंडची राजधानी रांचीमधील तुपुदाना पोलीस ठाणे हद्दीतील घुटिया गावात पोहोचला होता. (The young man had come to kidnap his girlfriend he took her mother with him )

हे ही वाचा-200 रुपयांच्या लेहग्यासाठी 1 लाखांवर पाणी; Google Pay वरुन Transaction महागात

कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार अल्पवयीन प्रेयसीला कारमध्ये बसवल्यानंतर आरोपी निघणारच होता, तेवढ्यात तिची आई आली व मुलीला पळवून घेऊन जाण्याचा विरोध करु लागली. यानंतर आरोपी चंदनने कार ड्रायव्हरच्या मदतीने प्रेयसीच्या आईलाही जबरदस्तीने कारमध्ये बसवलं आणि दोघांना घेऊन पळू लागला.

आईला रस्त्यातच उतरुन दिलं

तरुणीच्या आईने दिलेल्या माहितीनुसार आरोपीने त्यांना आणि अल्पवयीन मुलीला गाडीत बसवलं आणि बालसरिंग रिंग रोडवर घेऊन गेला. यानंतर त्याने प्रेयसीच्या आईला कारमधून खाली उतरवून दिलं आणि कार पुढे निघून गेली.

पोलिसांच्या तपासानंतर आरोपी ताब्यात

यादरम्यान कुटुंबीयांनी याची सूचना पोलिसांना दिली आणि एसएसपी यांच्या निर्देशानुसार रिंग रोडवर लावलेल्या सीसीटीव्ही कारचा नंबर मिळवला. यानंतर ओरमांझी पोलिसांनी रिंग रोडवर वाहनांचा तपास करण्यास सुरुवात केली.  (The young man had come to kidnap his girlfriend he took her mother with him ) काही वेळानंतर पोलिसांनी कार थांबवून तपास केला असता, एक प्रियकर-प्रेयसीचा जोडा दिसला. यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. पोलिसांनी अल्पवयीन मुलीला कुटुंबीयांकडे सोपललं तर तरुणाविरोधात प्राथमिक गुन्हा दाखल केला आहे.

First published:
top videos