मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

आधी पुलावरून दोघांना वाचवले अन् आज एका तरुणासोबत घडलं भयंकर, जालन्यातील घटना

आधी पुलावरून दोघांना वाचवले अन् आज एका तरुणासोबत घडलं भयंकर, जालन्यातील घटना

गेल्या 4 दिवसापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जालन्यातील नदी-नाले ओसंडून वाहत असून कुंडलिका नदीच्या पात्रात पाण्याची पातळी वाढली आहे.

विजय कमळे पाटील, प्रतिनिधी

जालना, 18 ऑगस्ट : जालन्यातील कुंडलिका नदीवरील रोहनवाडी येथील फरशीपुलाच्या पाण्यात एक इसम वाहून गेल्याचा प्रकार आज समोर आला आहे. ऋषीकेश नाटकर असं या बेपत्ता युवकाचे नाव असून तो रात्रीपासून बेपत्ता असल्याचं कळतं.

गेल्या 4 दिवसापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जालन्यातील नदी-नाले ओसंडून वाहत असून कुंडलिका नदीच्या पात्रात पाण्याची पातळी वाढली आहे.

सुशांत खरंच नैराश्याग्रस्त होता?आत्महत्येच्या 12 दिवसांआधीचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट

जालना शहरातून रोहनवाडी मार्गे घनसावंगीकडे जाणाऱ्या बायपास जवळील कुंडलिका नदीवर असलेल्या फरशी पुलावरून दर पावसाळ्यात पाणी वाहत असते. या पुलावरून ऋषीकेश नाटकर हा तरुण घनसावंगीकडे जात असताना पुलावरून वाहत असलेल्या पाण्याचा अंदाज न आल्याने थेट नदीपात्रात पडला. पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने हा तरुण  पाण्यासोबतच वाहून गेला.

'हे' स्वप्न पूर्ण झाल्यावर रोहित शर्मा घेणार निवृत्ती! स्वत:च केला खुलासा

या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेतली. सोमवारी याच ठिकाणी दुचाकीवरील जोडपं वाहून जात असताना ग्रामस्थांनी त्यांना वाचवलं होतं. या घटनेचा मोबाईलवरून रिकोर्ड केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

दरम्यान, सदर फरशी पुलावर पोलिसांना तैनात करून त्या पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.

First published:

Tags: जालना