नवीन कुर्ता-पायजमा दिला नाही म्हणून जेलमधून पत्नीला दिला तिहेरी तलाक!

नवीन कुर्ता-पायजमा दिला नाही म्हणून जेलमधून पत्नीला दिला तिहेरी तलाक!

पत्नीने नवीन कुर्ता-पायजमा दिला नाही म्हणून पतीने तिहेरी तलाक दिल्याचं एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. सगळ्यात गंभीर म्हणजे पती हा तरुंगात असतो.

  • Share this:

उत्तर प्रदेश, 26 ऑगस्ट : तिहेरी तलाकचा कायदा रद्द केल्यानंतरही तीन वेळा तलाक बोलून घटस्फोट देण्याचे प्रकार काही थांबत नाही आहेत. पत्नीने नवीन कुर्ता-पायजमा दिला नाही म्हणून पतीने तिहेरी तलाक दिल्याचं एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. सगळ्यात गंभीर म्हणजे पती हा तरुंगात असतो. त्याला ईदच्या वेळी पत्नीने नवीन कपडे आणून दिले नाही म्हणून त्याने पत्नीला तीन वेळा तलाक बोलून घटस्फोट दिला आहे. या संपूर्ण प्रकरणाविरोध पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

खुनाच्या आरोपाखाली पती तुरुंगात

पोलीस डीके शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, या संपूर्ण प्रकरणाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून यावर आता पोलीस तपास सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशच्या मुरादाबादमधील जेलमध्ये हा प्रकार उघडकीस आला आहे. गजरौला ठाणे परिसरात नौनेर नावाचं एक गाव आहे. गावात राहणाऱ्या मुर्शिदाचा पती जुल्फिकार उर्फ कलवा 2014 पासून खुनाच्या आरोपाखी मुरादाबाद कारागृहात बंद आहे. त्याला 4 मुलं आहेत. बायको मजूर म्हणून काम करते. तुरुंगात जाण्याआधी  पती चारित्र्यावर संशय घेत असल्याचं या महिलेनं पोलिसांना सांगितलं आहे.

इतर बातम्या - शाळेतच सुरू होते मुख्याधापकांचे शिक्षिकांसोबत अश्लील चाळे, PHOTOS व्हायरल

तलाक मागे घेण्यासाठी नातेवाईकांनी समजावून सांगितले पण पतीने ऐकलं नाही

11 ऑगस्ट रोजी, बकरी ईदच्या एक दिवस आधी, मुर्शिदा आपल्या पतीच्या भेटण्यासाठी जेलमध्ये गेली होती. आर्थिक अडचणीमुळे तिला पतीसाठी नवीन कुर्ता-पायजामा घेता आला नाही. यामुळे जुल्फिकार तिच्यावर रागावला आणि त्याने तिला तिहेरी तलाक दिला. यावेळी त्याने तिला जेलमध्ये शिविगाळही केली. यावर गावातील साजिद आणि आसिफने पतीची समजूत घालण्यासाठी तुरुंगात गेले, परंतु त्याने कोणाचंही ऐकलं नाही आणि पत्नीला घटस्फोट दिला.

इतर बातम्या - खळबळजनक! मुख्यमंत्र्यांच्या ड्रिम प्रोजेक्टमधून कंत्राटदारांनी लुटले 100 कोटी

एसपीच्या सूचनेवरून गुन्हा दाखल

महिलेच्या तक्रारीवरून पोलीस स्थानकामध्ये पतीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यानंतर रविवारी अमरोहाच्या पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार गजरौला पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या प्रकरणाची अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

SPECIAL REPORT : 'चलो मुर्गा बनो' पोलिसांसोबत हुज्जत तरुणांना पडली भारी!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 26, 2019 09:59 PM IST

ताज्या बातम्या