S M L

नवसृजनाच्या 'वसंत'सोहळ्याची चाहूल

फाल्गुन महिना संपत आला की चाहूल लागते ती 'वसंता'ची. रम्य पावसाळा आणि हिवाळ्यानंतर निसर्ग वसंत ऋतूसाठी तयार होतो. निसर्गाचं हे रूपं साहित्यिकांना लिहायला प्रवृत्त करतं. कवींना नवं काव्य स्फुरण्यासाठी प्रेरणा देतं

Ajay Kautikwar | Updated On: Feb 26, 2018 04:48 PM IST

नवसृजनाच्या 'वसंत'सोहळ्याची चाहूल

मनोज जयस्वाल, वाशीम 26 फेब्रुवारी : फाल्गुन महिना संपत आला की चाहूल लागते ती 'वसंता'ची. रम्य पावसाळा आणि हिवाळ्यानंतर निसर्ग वसंत ऋतूसाठी तयार होतो. निसर्गाचं हे रूपं साहित्यिकांना लिहायला प्रवृत्त करतं. कवींना नवं काव्य स्फुरण्यासाठी प्रेरणा देतं...रंगोत्सवांसारख्या नव्या सणांची चाहूल देतं. हा असतो 'नवसृजना'चा सोहळा. जुनी पानं गळून पडतात. नवीन पालवी सृजन पावते आणि निसर्ग नव्या रंगात न्हावून निघतो.....

वाशिम जिल्ह्यातल्या कारंज्यांच्या रानात सध्या पिवळा धमक पळस फुललाय. पळस म्हटलं की आपल्याला आठवतात ती लालबुंद मनमोहक फुलं. वसंतातला हा पिवळा पळस तसा दुर्मिळ. या पळसाची ही खास मनमोहकं रूपं टिपली आहेत ती कारंज्याचे शिक्षक गोपाळ खाडे यांनी.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 26, 2018 04:28 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close