तिजोरी घेऊन पळून चालले होते चोर, टेम्पो खांबाला धडकला अन्....

तिजोरी घेऊन पळून चालले होते चोर, टेम्पो खांबाला धडकला अन्....

गस्तीवर असणाऱ्या पोलिसांना पाहून पळून जाणाऱ्या चोरट्यांच्या टेम्पोची विद्युत खांबाला धडकला.

  • Share this:

विजय कमळे पाटील, प्रतिनिधी

जालना, 21 डिसेंबर : तिजोरी घेऊन पळून जाणाऱ्या चोरांचा डाव पोलिसांनी उधळून लावला आहे. या चोरांकडून एक भल्ली मोठी तिजोरी जप्त करण्यात आली आहे.

गस्तीवर असणाऱ्या पोलिसांना पाहून पळून जाणाऱ्या चोरट्यांच्या टेम्पोची विद्युत खांबाला धडकला. चोरीच्या टेम्पोमधून चोरून आणलेली तिजोरी सोडून चार चोरटे पसार झाले. ही घटना जालना शहरातील सुवर्णकार नगर भागात पहाटे साडेतीन वाजता घडली.

सुवर्णकार नगर भागात रात्री सदर बाजार आणि तालुका जालना पोलिसांचं एक पथक गस्तीवर होतं.  पहाटेच्या सुमारास एक टेम्पो एमएच-20, सिटी-4621 क्रमांकाचा हा टेम्पो संशयास्पदरित्या आढळून आला. पोलिसांनी हटकले असता त्यांनी पळ काढला. याच गोंधळात टेम्पो एका विद्युत खांबाला धडकला. पोलिसांच्या सतर्कतेमुळे चोरटे चोरीची टेम्पो आणि त्यात असलेली तिजोरी सोडून पळ काढला.

टेम्पोत असलेली तिजोरी जुनाट असून त्यामध्ये किती रोकड आहे. ही तिजोरी कुठून चोरी केली याचा अधिक तपास पोलीस करत आहे. तर पसार झालेल्या चोरट्याचा शोध ही पोलिसांनी सुरू केला आहे.

वाढदिवशीच भाजप कार्यकर्त्यावर धारदार शस्त्राने वार करून डोक्यात घातला दगड

बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव शहरातील घाटपुरी नाका परिसरात शुक्रवारी मध्यरात्री दोन युवकांच्या निर्घृण हत्येमुळे खळबळ उडाली आहे. मारेकऱ्यांनी युवकांवर धारदार शस्त्राने सपासप वार करून त्यांची हत्या करण्यात आली. नंतर त्यांच्या डोक्यात दगड घालण्यात आला. दोन्ही युवक भाजपचे सक्रीय कार्यकर्ते असल्याची माहिती मिळाली आहे. शिवाजी नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. विशाल देशमुख (वय 30, रा.घाटपुरी नाका) आणि सचिन पवार (वय 33) अशी हत्या झालेल्या युवकांची नावं आहेत.

मिळालेली माहिती अशी की, विशाल देशमुख याचा शुक्रवारी वाढदिवस होता. विशाल आणि त्याचे काही मित्र शुक्रवारी रात्री वाढदिवसाच्या पार्टीला गेले होते. घाटपुरी नाक्यावर विकास आणि सचिनवर तीन जणांनी धारधार शस्राने सपासप वार केले. नंतर त्यांची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. वाढदिवशी हा धक्कादायक प्रकार घडल्याने देशमुख कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली असून दोन संशयित फरार आहे. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

अवैध व्यवसायातून विकास आणि सचिनची हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी शिवाजी नगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सध्या अटक करण्यात आलेल्या आरोपीची कसून चौकशी सुरू आहे. गजानन भोंगळ,रवींद्र भोंगळ,अरविंद भोंगळ अशी संशयितांची नाव असून सध्या पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे. दरम्यान या प्रकरणी दोन संशयित आरोपी अद्यापही फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

Published by: sachin Salve
First published: December 21, 2019, 5:00 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading