मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /डेपो का बंद केला नाही? म्हणत एसटी चालकाने घेतले होते विष, बीडमधील घटनेचा खुलासा

डेपो का बंद केला नाही? म्हणत एसटी चालकाने घेतले होते विष, बीडमधील घटनेचा खुलासा

'कर्मचारी आम्हाला सांगत आहे की डेपो सुरू करा, आम्ही त्यासाठी प्रयत्न करतोय. आमची विनंती आहे की सर्वांनी यावे'

'कर्मचारी आम्हाला सांगत आहे की डेपो सुरू करा, आम्ही त्यासाठी प्रयत्न करतोय. आमची विनंती आहे की सर्वांनी यावे'

ऐन दिवाळीच्या दिवशी कर्तव्यावर असताना कदम याने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती.

बीड, 05 नोव्हेंबर :  एसटी महामंडळ (maharashtra st bus) राज्य सरकारमध्ये (mva government) विलीन करून घेण्याच्या मागणीसाठी राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांनी ( ST bus workers strike)  काम बंद आंदोलन पुकारले आहे. बीडमध्ये (beed) ऐन लक्ष्मीपूजनाच्या आधी एका एसटी चालकाने विष प्राशन करून आत्महत्येचा (Attempted suicide) प्रयत्न केला होता. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. पण डेपो बंद का केला नाही, म्हणून त्याने हे कृत्य केल्याचं तपासातून समोर आलं आहे.

बीड जिल्ह्यात कडा बस स्थानकावर शुक्रवारी ही घटना घडली होती. बाळू महादेव कदम (वय 35) असे चालकाचे नाव आहे. तो आष्टी येथील रहिवासी आहे. ऐन दिवाळीच्या दिवशी कर्तव्यावर असताना कदम याने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती.

बाळू महादेव कदम याच्या आत्महत्येचा प्रयत्न करण्याच खर कारण समोर आलं आहे. आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती स्थिर आहे. राज्यातील अनेक डेपो बंद आहेत, मग आष्टीचं का सुरू?  हा डेपो देखील  बंद करावा, असं सांगूनही न ऐकल्याने बस चालक कदम याने विषारी कीटकनाशक प्राशन केले.

अ‍ॅटमबॉम्बने घेतला पुण्यातील तरुणाचा जीव; दुर्दैवी घटनेत दिवाळीदिवशीच झाला अंत

आष्टी येथील बाळू महादेव कदम हे तीन वर्षांपासून आष्टी आगारात चालक पदावर कार्यरत आहेत. या पूर्वी ते अहमदनगर जिल्ह्यात कार्यरत होते. शुक्रवारी ते आष्टी आगारातून जामखेड-पुणे बस MH 20,BL 2086 ही घेऊन ते निघाले होते. यावेळी कडा बसस्थानकात बस चहापाण्यासाठी काही वेळ थांबली. याच दरम्यान, चालक बाळू कदम यांनी बसस्थानक परिसरात विषारी कीटकनाशक प्राशन केले.

रत्नागिरीत बोटीसह 6 खलाशी 10 दिवसांपासून बेपत्ता; बंदर विभागाचं घटनेकडे दुर्लक्ष

दरम्यान, चालक कदम यांनी विषारी औषध प्राशन केल्याचे लक्षात येताच, वाहतूक नियंत्रक आलिशा बागवान यांच्यासह अनेकांनी, त्यांना तातडीने आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. सद्य प्रकृती स्थिर आहे. दरम्यान. ऐन दिवाळीत आत्महत्येचा प्रयत्न केल्यानं एसटी कर्मचाऱ्यातील नैराश्य पुन्हा एकदा समोर आलं आहे.

First published:
top videos

    Tags: Beed