Home /News /news /

खाली दुकानाला लागली भीषण आग, चिमुरड्यांसह कुटुंबाने पहिल्या मजल्यावरून मारल्या उड्या!

खाली दुकानाला लागली भीषण आग, चिमुरड्यांसह कुटुंबाने पहिल्या मजल्यावरून मारल्या उड्या!

आज पहाटे तीन वाजेच्या सुमारास दुकानाला आग लागली. यात मोठ्या प्रमाणात रेडिमेड कापड साहित्य होते.

    नरेंद्र मते, प्रतिनिधी हिंगणघाट, 17 ऑक्टोबर : हिंगणघाट येथील  स्थानिक जगनाथ वार्ड येथील मुख्य मार्गावर असलेल्या वर्धमान टेक्सटाइल्स या रेडिमेड कापड दुकानसहित निवासस्थानाला भीषण आग लागली होती. खाली दुकानाला आग लागल्यानंतर स्वत: जीव वाचवण्यासाठी कुटुंबातील सदस्यांनी पहिल्या माळ्यावरून खाली उड्या टाकून जीव वाचवला. सुनील पितलिया यांचे जगन्नाथ  वार्डातील मुख्य मार्गावर वर्धमान टेक्सटाइल्स हे कापड दुकान असून पहिल्या माळ्यावर निवासस्थान आहे.  आज पहाटे तीन वाजेच्या सुमारास दुकानाला आग लागली. यात मोठ्या प्रमाणात रेडिमेड कापड साहित्य होते. आग लागल्याने धुराचे लोट पहिल्या व दुसऱ्या मजल्यापर्यंत पोहाचले. यावर दोन्ही मजल्यावरील पितलिया यांचे निवासस्थान आहे.  आगीमुळे प्रचंड उकाडा  निर्माण झाल्याने कुटुंबातील सदस्य जागे झाले. पहिल्या माळ्यावर आगीचे लोट पोहचल्याने कुटुंबातील सदस्यांनी जीव वाचवण्याकरिता पहिल्या मजल्यावर बाल्कनीतून टिनाचे शेडवर उडया मारल्या व खाली सुखरूप उतरले. परंतु, आग लागल्याने ते काही प्रमाणात जखमी झाले. सिंचन घोटाळा प्रकरणी ईडीचे पत्र; अजित पवार, तटकरेंच्या अडचणी वाढणार? दरम्यान, आगीचे लोट दिसू लागल्याने शेजारी जागे झाले. त्यांनी लगेच हिंगणघाट नागरपालिकेच्या अग्निशामन दलाला माहिती दिल्यानंतर लगेच दाखल झाले. आग विझविली. परंतु, तत्पुरवी दुकानातील व घरातील पूर्ण साहित्य जळून खाक झाले होते. ट्रॅफिक पोलिसांबरोबर हुज्जत घालणे पडेल महागात, रद्द होऊ शकते ड्रायव्हिंग लायसन्स आग विझविताना सिलेंडरचा स्फोट होऊन अग्निशमन दलाचे नितिन जंगले आणि गणेश सायंकार हे दोन कर्मचारी जखमी झाले. या दुर्घटनेत 50 लाख नुकसानीचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आगीत दुकान मालक सुनील पितलिया, त्यांची पत्नी कोमल पितलिया,मुलगा राज, मुलगी रिया जखमी झाल्याने त्यांना सेवाग्राम रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.  शार्ट सर्किटमुळे आग लागल्याची शंका व्यक्त होत आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या