रेमडिसीवीर-ऑक्सिजनच्या तुडवड्याचा प्रश्न लवकरच सुटण्याचे चिन्ह; नितीन गडकरींकडून मध्यस्ती

रेमडिसीवीर-ऑक्सिजनच्या तुडवड्याचा प्रश्न लवकरच सुटण्याचे चिन्ह; नितीन गडकरींकडून मध्यस्ती

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यात राज्यात रेमडिसीव्हीरचा इंजेक्शनचा आणि ऑक्सिजनचा तुडवडा जाणवत असल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

  • Share this:

मुंबई, 16 एप्रिल : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यात राज्यात रेमडिसीव्हीरचा इंजेक्शनचा आणि ऑक्सिजनचा तुडवडा जाणवत असल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान यामध्ये आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मध्यस्ती ( Nitin Gadkari mediated ) करीत असल्याचं समोर आलं आहे. राज्यातील रेमडीसिवीर आणि  ऑक्सिजनच्या तुटवड्यावर तोडगा काढण्यासाठी गडकरी यांनी मध्यस्ती केल्याचं समोर आलं आहे.

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नितीन गडकरी यांना केंद्राकडून मदत मिळावी यासाठी फोन केला होता. आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांच्यात दूरध्वनीवरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली मध्यस्ती करून लवकर तोडगा काढण्याचे आश्वासन दिलं आहे.

हे ही वाचा-मुंडे बहीण-भावांमध्ये पुन्हा जुंपली; कोरोनाच्या संकटात आरोप-प्रत्यारोप

दरम्यान केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर (Prakash Javadekar) यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह (Tests covid positive) आला आहे. शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्विट करुन या संदर्भातील माहिती दिली आहे. आजच कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येदियुरप्पा यांनाही कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती समोर आली आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: April 16, 2021, 7:59 PM IST

ताज्या बातम्या