Home /News /news /

tomato rate : लालभडक दिलधडक टोमॅटोचा भाव झाला अचानक कडक, किरकोळ बाजारात 100 रुपये किलो टोमॅटोचा दर

tomato rate : लालभडक दिलधडक टोमॅटोचा भाव झाला अचानक कडक, किरकोळ बाजारात 100 रुपये किलो टोमॅटोचा दर

सिझनच्या सुरूवातील 30 किलो असणारा टोमॅटो (tomato) अचानक मागच्या चार दिवसांपासून 100 रुपये किलो झाला आहे. (tomato rate today)

    मुंबई, 22 मे : मागच्या काही दिवसांपासून टोमॅटोला चांगला दर (tomato rate) मिळत आहे. सिझनच्या सुरूवातील 30 किलो असणारा टोमॅटो (tomato) अचानक मागच्या चार दिवसांपासून 100 रुपये किलो झाला आहे. दरम्यान आज कोल्हापूर,  पुणे, मुंबईतील घाऊक तसेच किरकोळ बाजारात टोमॅटोचे (tomato rate today) दर 80 ते 100 रुपये किलो इतका झाला आहे. येत्या काही दिवसांत टोमॅटोच्या पुरवठ्यात वाढ न झाल्यास टोमॅटोचे दर 100 रुपये प्रति किलोच्या वर जाण्याची शक्यता आहे. उन्हाळ्यामुळे टोमॅटो लागवडीत मोठी घट झाली आहे. त्यामुळे बाजारात टोमॅटोची आवक कमी झाली आहे. सध्या लग्नसराईचा सिजन सुरू आहे. तसेच उन्हामुळे टोमॅटोला चांगली मागणी असते. परंतू बाजारात पुरेसा पुरवठा नसल्याने टोमॅटोच्या दरांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबईमध्ये नियमितपणे सर्वाधिक मागणीमध्ये टोमॅटो (Tomatoes Price) आहे. पावभाजी, सॅलॅड आणि सर्वसामान्य नागरिकांच्या आहारातही टोमॅटोची भाजी नियमित केली जाते. त्यामुळे वर्षभर टोमॅटोची मोठ्या प्रमाणात मागणी असते.  मुंबईत सातारा, पुणे, नाशिकसह दक्षिणेतील राज्यांमधूनही टोमॅटोची आवक होत असते; मात्र, १५ दिवसांपासून कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडूमध्ये टोमॅटोची कमतरता निर्माण झाली आहे. तेथेही महाराष्ट्रातून टोमॅटो पाठविला जात आहे. मागणी वाढली मात्र यंदाचं टोमॅटोचं उत्पादन कमी झाल्यामुळे टोमॅटो वधारला आहे. यंदाच्या कडक उन्हाळ्यामुळे टोमॅटोच्या लागवडीत मोठी घट झाली आहे. त्यामुळे बाजारात टोमॅटोची आवकही कमी झालेली आहे. पण, लग्नसराईचा सिझन सुरू असल्यामुळे टोमॅटोला चांगलीच मागणी वाढली. परंतु, तुलनेने पुरवठा बाजारात होत नाही. परिणामी, मागील दोन दिवसांत टोमॅटोचे दर १०० रुपयांपर्यंत पोहोचलेले आहेत. मागील २ वर्षांपूर्वी हाच टोमॅटो केवळ ५-७ रुपये किलोंवर विकला गेला होता. मात्र, या दरात उत्पादनाचा खर्चही न निघल्यामुळे शेतकऱ्यांनी टोमॅटो रस्त्यावर फेकून दिला होता. एकीकडे टोमॅटो उत्पादक शेतकऱ्याला चांगला दर मिळत आहे तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे. अशीच अवस्था कलिंगड, द्राक्ष बागायतदारांची झाली आहे.
    Published by:Sandeep Shirguppe
    First published:

    Tags: Farmer, Tomato, Tomato rate

    पुढील बातम्या