Elec-widget

...आणि म्हणून पेट्रोल, डिझेलनंतर सीएनजी आणि पीएनजी दरामध्येही होईल वाढ

...आणि म्हणून पेट्रोल, डिझेलनंतर सीएनजी आणि पीएनजी दरामध्येही होईल वाढ

पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीनंतर आता सीएनजी आणि पीएनजीच्या दरामध्येही वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली.

  • Share this:

मुंबई, 22 सप्टेंबर : पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीनंतर आता सीएनजी आणि पीएनजीच्या दरामध्येही वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली. डॉलरच्या तुलनेमध्ये रुपयाची घसरण झाल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या दरवाढीवर त्याचा परिणाम  होतोय. त्यामुळे सर्वसामान्य त्रस्त झालेत. त्यातच आता ऑक्टोबरमध्ये पीएनजी गॅसची किंमत ठरवण्यात येणार आहे. त्यामुळे आता सर्वसामान्यांनी नेमकं काय करायचं असा प्रश्न उपस्थित राहतो.

इंधन दरवाढीचं सत्र गेल्या काही दिवसांपासून सतत सुरूच आहे. आज पेट्रोलच्या दरात 11 पैशांची वाढ झालीये. तर डिझेलचे दर कायम आहेत. मुंबईमध्ये आज पेट्रोलचा दर 89 रुपये 80 पैसे प्रति लिटर आहे.

पुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत

वाहतूक खर्चामुळे काही शहरांमध्ये इंधन किंमती मुंबईपेक्षा अधिक आहेत. माध्यमांच्या अहवालानुसार, यात परभणी, नंदुरबार, नांदेड, लातूर, जळगाव, बीड, औरंगाबाद आणि रत्नागिरी या जिल्ह्यांचा समावेश आहेत. इथं पेट्रोल 90 रुपयांपेक्षा जास्त आहे.

इंधन दरवाढीचा फटका पूजेसाठी वापरल्या जाणाऱ्या कापरालाही बसला आहे. पेट्रोलचे दर वाढल्याने पंधरा दिवसापूर्वी 400 रुपये किलो असलेल्या कापराचे दर वाढत जाऊन बाराशे रुपयांवर पोहोचले आहे. कापूर हा ज्वलनशील पदार्थ म्हणून ओळखला जातो. तो बनवताना त्यामध्ये पेट्रोलजन्य पदार्थाचा वापर करण्यात येतो.

Loading...

स्मशानभूमीत 12 वाजता मुलाची बर्थडे पार्टी, पाहुणांना दिली बिर्याणीची मेजवानी

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 22, 2018 12:07 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...