पोलिसांना मिळाला होता रिपोर्ट; पोस्टमार्टेमच्या 10-12 तासांपूर्वी झाला होता सुशांत सिंहचा मृत्यू

पोलिसांना मिळाला होता रिपोर्ट; पोस्टमार्टेमच्या 10-12 तासांपूर्वी झाला होता सुशांत सिंहचा मृत्यू

सुशांत प्रकरणात मुंबई पोलिसांनी दिलेल्या पुराव्याचा सीबीआयकडून पुन्हा तपास केला जात आहे

  • Share this:

मुंबई, 23 ऑगस्ट : केंद्रीय तपास ब्यूरो (CBI) ने सुशांत सिंह राजपूत प्रकरणात (Sushant Singh Rajput death Case) तपासाला जोरात सुरुवात केली आहे. मुंबई पोलिसांनी (Mumbai Police)  या केसशी संबंधित सर्व पुरावे सीबीआयकडे सोपविले आहे. मात्र CBI त्या सर्व पुराव्यांवर पुन्हा तपास करीत आहे.

एका न्यूज पोर्टलमध्ये आलेल्या बातमीनुसार रुग्णालयात पोस्टमॉर्टेम करणाऱ्या डॉक्टरांनी कथित स्वरुपात मुंबई पोलिसांना सांगितले होते की पोस्टमॉर्टेम सुशांतच्या मृत्यूच्या जवळपास 10-12 तासांनंतर झाला. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूचे पोस्टमॉर्टेम 14 जूनच्या रात्री 11:30 वाजता झाले होते.

बातमीत दिल्यानुसार 27 जुलै रोजी मुंबई पोलिसांनी मृत्यूच्या वेळी सुशांतच्या रुममध्ये कथित स्वरुपात मिळालेल्या कुर्ताच्या वजन उचलण्याच्या क्षमतेबाबत फॉरेंसिक रिपोर्ट मिळवला आहे. रिपोर्टनुसार हा कुर्ता 200 किलोग्रॅमपर्यंतचे वजन सहज उचलू शकतो. त्याच कपड्याच्या फायबरचं निशाण सुशांतच्या गळ्यावर दिसत आहे.

रुग्णालयात डॉक्टरांची तयार केली 4 सदस्यीय टीम

सांगितले जात आहे की, सुशांतच्या मृत्यूच्या वेळेचा उल्लेख त्याच्या पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये देण्यात आलेला नाही. पोस्टमॉर्टेम रिपोर्टवर आपल मत देण्यासाठी रुग्णालयाच्या डॉक्टरांची 4 सदस्यीय टीम तयार करण्यात आली आहे. टीम विश्लेषण केल्यानंतर सुशांतच्या मृत्यूच्या वेळेबाबत रिपोर्ट देतील. टीओआयमध्ये आलेल्या बातमीनुसार मुंबई पोलीस कथित स्वरुपात सुशांतच्या मृत्यूसंबंधित डॉक्टरांना प्रश्न पाठवले आहे. ज्यांनी सुशांच्या मृतदेहाचे पोस्टमार्टेम केले त्यांना हा प्रश्न पाठविण्यात आला होता. डॉक्टरांनी ऑगस्ट रोजी मुंबई पोलिसांना याचं उत्तर दिलं होतं. डॉक्टरांची रिपोर्ट सुप्रीम कोर्टात पाठविण्यात आली आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: August 23, 2020, 11:34 PM IST

ताज्या बातम्या