क्रूरतेचा कळस! गोठ्यात बांधलेल्या बैलाला रात्रीच्या अंधारात दिला गळफास

क्रूरतेचा कळस! गोठ्यात बांधलेल्या बैलाला रात्रीच्या अंधारात दिला गळफास

गोठ्यात बांधलेल्या एका अडीच वर्षांच्या छोट्या बैलाला अज्ञात नराधमानं रात्रीच्या अंधारात गळफास देऊन ठार मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

  • Share this:

पुणे, 18 डिसेंबर: काही दिवसांपूर्वी इंदापूर तालुक्यात एका पिसाळलेल्या बैलाला जेसीबीने चिरडून ठार केल्याची बातमी समाज माध्यमात पसरली होती. चीड निर्माण करणाऱ्या या घटनेवर अनेकांनी संताप व्यक्त केला होता. अगदी अशीच घटना समोर आली आहे.

गोठ्यात बांधलेल्या एका अडीच वर्षांच्या छोट्या बैलाला अज्ञात नराधमानं रात्रीच्या अंधारात गळफास देऊन ठार मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी मंजर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा...पंढरपुरचा भाजपचा बडा नेता राष्ट्रवादीच्या वाटेवर, शरद पवारांसोबत गाडीतून प्रवास

पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील कुरवंडी गावात माणुसकीला काळीमा फासणारी दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. गोठ्यात बांधलेल्या अडीच वर्षांच्या बैलाला अज्ञात व्यक्तीने ठार मारले आहे.

बैलाचे मालक संदीप तोत्रे यांनी पंढरपूर येथून खिलारी जातीचे दीड वर्षे वयाचे वासरू विकत आणलं होतं. त्याला चांगला खुराक दिल्याने वासरू धष्ठ-पुष्ट झाले होते. या वासराला अनेकांनी चांगली किंमत देऊन खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, संदीप तोत्रे यांनी हे वासरू विकले नाही. मात्र, बुधवारी रात्रीच्या सुमारास कोणीतरी गोठ्यातील खांबाला दोरखंडानं बैलाला गळफास घेऊन ठार मारलं. संदीप तोत्रे यांनी या प्रकरणी मंचर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा...धक्कादायक! धाकट्या बहिणीनेच गोळी झाडून केली मोठ्या बहिणीची हत्या

बैलाच्या हत्येनंतर परिसरात संतापाची लाट पसरली आहे. संदीप तोत्रे यांनी मात्र पोलिसांत तक्रार करून यातील आरोपीला पकडावे व कठोरात कठोर शिक्षा करावी, अशी मागणी केली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून अशा क्रूर प्रवृत्तीच्या नराधम आरोपींना पोलिसांनी तातडीनं अटक करण्याची मागणी आता सर्वसामान्य नागरिकांकडून होवू लागली आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: December 18, 2020, 3:32 PM IST

ताज्या बातम्या