मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

मुंबईकरांची चिंता वाढली, कोरोना संसर्गाबाबत नवी माहिती समोर

मुंबईकरांची चिंता वाढली, कोरोना संसर्गाबाबत नवी माहिती समोर

राजधानी मुंबईतही पुन्हा कोरोनाचा उद्रेक होतोय की काय, अशी स्थिती आहे.

राजधानी मुंबईतही पुन्हा कोरोनाचा उद्रेक होतोय की काय, अशी स्थिती आहे.

राजधानी मुंबईतही पुन्हा कोरोनाचा उद्रेक होतोय की काय, अशी स्थिती आहे.

मुंबई, 26 जून : लॉकडाऊन शिथिल करण्याच्या निर्णयाला आता काही दिवस लोटल्यानंतर राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांमध्ये कमालीची वाढ होऊ लागली आहे. अशातच राजधानी मुंबईतही पुन्हा कोरोनाचा उद्रेक होतोय की काय, अशी स्थिती आहे. कारण मुंबईमधील 4 प्रभागांमध्ये कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असल्याचं ताज्या आकडेवारीतून स्पष्ट झालं आहे.

मुंबईमध्ये आता चार हजारांपेक्षा जास्त करोना बाधित असलेल्या प्रभागांची संख्या 4 वर पोहोचली आहे. आज पी नॉर्थ म्हणजेच मालाड प्रभागाची भर पडली आहे. याआधी अंधेरी पूर्व, जी उत्तर आणि अंधेरी पश्चिम या 3 प्रभागात 4 हजाराहून अधिक कोरोना रुग्ण आढळले होते. त्यामुळे धारावी, वरळी या भागातील कोरोना आटोक्यात आल्याने दिलासा व्यक्त करण्यात येत असतानाच मुंबईच्या इतर भागात मात्र कोरोना वेगाने पसरत असल्याचं चित्र आहे.

दरम्यान, मुंबईसोबतच एमएमआर क्षेत्रात सुद्धा कोरोनाचा सातत्याने वाढणारा प्रादुर्भाव, कोरोनाच्या नियंत्रित केल्या जात असणार्‍या चाचण्या, कोरोनाबळींच्या संख्येत सातत्याने लक्षात येत असलेले बदल याचा समग्र आढावा घेऊन तातडीने उपाययोजना करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्र लिहिलं आहे.

मुंबई महापालिकेचं खासगी रुग्णालयांना शेवटचं अलटीमेटम

'कोरोना‌ कोविड 19' या संसर्गजन्य आजाराची बाधा होऊन दुर्दैवी मृत्यू झालेल्या व्यक्तींची माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकाकडे 48 तासांच्या आत कळविणे बंधनकारक असल्याचे आदेश हे 8 जून 2020 रोजी निर्गमित करण्यात आले होते. या अनुषंगाने ज्या रुग्णालयांनी 48 तासांच्या आत महापालिकेकडे माहिती कळविलेली नाही, तसेच सदर माहिती त्यांच्या स्तरावर अद्यापही प्रलंबित आहे; अशा रुग्णालयांनी येत्या सोमवारी, म्हणजेच दिनांक 29 जून 2020 रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत सदर माहिती कळवावयाची असल्याचे निर्देश महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी आज दिले आहेत.

First published:

Tags: Coronavirus, Mumbai news