औरंगाबादमध्ये कोरोनाचा धुमाकूळ, रुग्णांची संख्या 239 वर

औरंगाबादमध्ये कोरोनाचा धुमाकूळ, रुग्णांची संख्या 239 वर

औरंगाबादमध्ये आज सकाळी आणखी 23 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहे.

  • Share this:

औरंगाबाद, 02 मे : महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच मुंबई, पुणे, मालेगावनंतर आता औरंगाबादमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत असल्याने चिंतेचं वातावरण आहे. औरंगाबादमध्ये आज सकाळी आणखी 23 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहे.

औरंगाबाद शहरामध्ये गेल्या 24 तासांमध्ये अचानक कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांत तब्बल 62 रुग्ण आढळून आहे.  आज सकाळी आणखी 23 जणांचे रिपोर्ट हे पॉझिटिव्ह आले आहे. त्यामुळे औरंगाबादेत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता 239 पर्यंत पोहचली आहे.

हेही वाचा - पिंपरी चिंचवडमधून चिंताजनक बातमी,उपचारानंतरही 13 वर्षीय मुलीचे रिपोर्ट पॉझिटिव्ह

शुक्रवारी 1 मे रोजी दिवसभरात 32 नवीन रुग्ण आढळून आले होते. शहरात 13 मार्च रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. मात्र, पुढे संपुर्ण मार्च महिन्यात एकही नवा रुग्ण आढळून आला नाही. शिवाय पहिली महिला रुग्ण ही उपचाराअंती ठणठणीत बरी होऊन घरी परतली. त्यामुळे औरंगाबादकरांना काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र, एप्रिल महिन्यात कोरोनाने शहरात अक्षरश: धुमाकूळ घातला आहे.

 

हेही वाचा - भयंकर! भुकेल्या लेकरांचं सांत्वन करण्यासाठी आईनं चुलीवर दगड ठेवला उकळत आणि...

मागील शनिवारपर्यंत शहरातील रुग्णांची संख्या 52 पर्यंत पोहचली होती. त्यानंतर आता या संख्येत रोज झपाट्याने वाढ होत आहे. दोन दिवसात ही संख्या दुप्पट होऊन बुधवारी रात्री 130 वर पोहचली. त्यानंतर गुरूवारी सकाळी 21 नवीन आणि सायंकाळी तब्बल 26 असे एकूण 47 रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोनाबाधितांची संख्या 177 झाली आहे. त्यात शुक्रवारी आणखी 32 रुग्णांची भर पडली आहे. आणी आज सकाळी आणखी 23 रुग्ण वाढले आहे. त्यामुळे आतापर्यंत शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या  239 वर पोहोचली आहे.

 

संपादन - सचिन साळवे

First published: May 2, 2020, 9:37 AM IST
Tags: aurangabad

ताज्या बातम्या