Fake Followers च्या चर्चेत रॅपर बादशाहाचंही नाव; मुंबई पोलीस करणार चौकशी

Fake Followers च्या चर्चेत रॅपर बादशाहाचंही नाव; मुंबई पोलीस करणार चौकशी

फेक फॉलोअर्सच्या चर्चेत बॉलिवूडमधील दोन प्रसिद्ध अभिनेत्रींची नावं आहे, त्यांचीही चौकशी होण्याची शक्यता आहे

  • Share this:

मुंबई, 3 ऑगस्ट : सोशल मीडियावर प्रत्येकाला स्टार बनायचं आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर आणि यूट्यूबवर अनेक लोक आपला कंटेंट टाकतात आणि प्रसिद्ध होण्याचा प्रयत्न करतात. अशातच बॉलिवूडमधील अभिनेते, रॅपर्स आणि गायकदेखील विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा उपयोग करीत आहेत.

येथे कलाकार चाहत्यांसोबत आपलं काम शेअर करतात. कलाकार आपल्या फेक फोलोअर्सच्या माध्यमातून व्युज वाढविण्याचा प्रयत्न करीत असल्याची चर्चा आहे. आता या चर्चेत बॉलिवूड रॅपर बादशाह याला मुंबई पोलिसांनी समन्स पाठविला आहे.

फेक फॉलोअर्सची केली जाते खरेदी

सोशल मीडियावर फेर फॉलोअर्सच्या प्रकरणात मुंबई पोलिसांनी रॅपर बादशाहाला चौकशीसाठी समन्स पाठविलं आहे. गेल्या महिन्यात मुंबई पोलिसांनी  Information Technology Act provisions चं उल्लंघन करणाऱ्या एका केसचा खुलासा केला होता. यामध्ये सेलिब्रिटी आणि बॉलिवूडमधील मोठ्या लोकांच्या काही कंपन्या इन्स्टाग्राम, ट्विटर आणि अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फेक फॉलोअर्स खरेदी करीत होते.

View this post on Instagram

A post shared by BADSHAH (@badboyshah) on

तपासादरम्यान या फेक फॉलोअर्स जमा करणाऱ्या सेलिब्रिटींच्या यादीत बादशाहाचं नाव समोर आलं आहे. त्यांना मुंबई पोलिसांनी समन्स पाठवलं आहे. बादशाहाशिवाय काही टॉप अभिनेत्रींचीं नावेही समोर आली आहेत. त्यांनाही समन्स पाठविण्यात येऊ शकतो. आज बादशाह आणि त्यांच्या मॅनेजरना स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यासाठी बोलविले होते. क्राइम ब्रान्चच्या सुत्रांनुसार रॅपर बादशाह मंगळवारी आपली स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यासाठी पोलीस ठाण्यात येतील.

Published by: Meenal Gangurde
First published: August 3, 2020, 11:02 PM IST

ताज्या बातम्या