मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

औरंगाबादच्या नामकरणाला काँग्रेसचा विरोध, महाविकास आघाडीत वाद पेटणार?

औरंगाबादच्या नामकरणाला काँग्रेसचा विरोध, महाविकास आघाडीत वाद पेटणार?

 औरंगाबाद शहराच्या नामकरणाच्या मुद्यावरून  शिवसेना विरुद्ध काँग्रेस नवा वाद रंगण्याची चिन्हे आहे.

औरंगाबाद शहराच्या नामकरणाच्या मुद्यावरून शिवसेना विरुद्ध काँग्रेस नवा वाद रंगण्याची चिन्हे आहे.

औरंगाबाद शहराच्या नामकरणाच्या मुद्यावरून शिवसेना विरुद्ध काँग्रेस नवा वाद रंगण्याची चिन्हे आहे.

औरंगाबाद, 31 डिसेंबर : औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या (aurangabad municipal corporation election result 2021) तोंडावर राजकीय वातावरण तापले आहे. सत्ताधारी असलेल्या महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेना (Shivsena) आणि काँग्रेस (Congress) पक्ष आमनेसामने उभे ठाकले आहे. काँग्रेसने औरंगाबाद शहराचे नामकरण होऊ देणार नाही, असा पवित्राच घेतला आहे. औरंगाबाद (Aurangabad) शहराचे नाव संभाजीनगर (Sambhajinagar) करण्याचा प्रस्ताव गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. पण ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नामकरणाच्या मुद्याला तोंड फुटले आहे. शिवसेनेनं औरंगाबाद शहराचे नामकरण संभाजीनगर करणारच अशी ठाम भूमिका घेतली आहे. मोहाच्या दारुचा ब्रँड; या राज्याने तयार केली 'हेरिटेज मदिरा पॉलिसी' तर दुसरीकडे औरंगाबाद दौऱ्यावर असलेले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी औरंगाबादचे नामाकरण करण्याचस विरोध दर्शवला आहे. ‘औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर होऊ देणार नाही, आमच्या त्याला विरोध असेल, असं वक्तव्य बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. बाळासाहेब  थोरात यांनी थेट विरोधात भूमिका मांडल्यामुळे  औरंगाबाद शहराच्या नामकरणाच्या मुद्यावरून  शिवसेना विरुद्ध काँग्रेस नवा वाद रंगण्याची चिन्हे आहे. पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई, तमिळनाडूतील दरोडेखोरांची टोळी जेरबंद दरम्यान, 24 डिसेंबर रोजी मनसेनं शहरात औरंगाबादच्या नामाकरणाबद्दल ठिकठिकाणी पोस्टर्स लावली होती. 'प्रजासत्ताक दिनापर्यंत औरंगाबाद शहराचं  नाव छत्रपती संभाजीनगर करा नाहीतर...' असे बॅनर मनसेकडून ठिकठिकाणी लावण्यात आले होते. त्यावरून सेना आणि मनसेमध्ये वाद पेटला होता. मनसेच्या मागणीला परिवहन मंत्री अनिल परब यांनी टोलावून लावले होते. नोकरदार वर्गासाठी आनंदाची बातमी! कामाचे तास आठच राहण्याची शक्यता- अहवाल 'औरंगाबाद शहरातील मनसेची बॅनरबाजी ही निवडणुकीच्या तोंडावर सुरु आहे. मनसेच्या होर्डिंगवर 'नाहीतर' असं लिहिलेले आहे. असे अनेक 'नाहीतर' आम्ही पाहिले आहेत. अशा धमक्यांना आम्ही घाबरत नाही, असा टोला अनिल परब यांनी लगावला होता. तसंच  'संभाजीनगर' हे नाव आमच्या हृदयात आहे. आम्ही नेहमीच संभाजीनगर म्हणतो, असंही परब म्हणाले होते.
Published by:sachin Salve
First published:

Tags: Aurangabad

पुढील बातम्या