नोएडा, 7 ऑगस्ट : कोरोना काळात ऑनलाइन वर्ग भरत असल्याने अगदी लहान मुलांच्या हातातही मोबाइल देण्यात आला. त्यामुळे आतापर्यंत आई-वडील मुलांना ज्या गोष्टीपासून दूर लोटत होते, त्याच्याशिवाय काही पर्यायच उरला नाही. दरम्यान अनेक ठिकाणी याचे दुष्परिणामही दिसत आहे. दिल्लीनजीक उत्तर प्रदेशातील नोएडामध्ये (Noida) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका 13 वर्षीय मुलीला तिच्या आईने मोबाइल फोनवर (Mobile Phone) गेम खेळण्यास नकार दिला व रागावली.
यानंतर मुलीने रागाच्या भरात गळफास घेऊन (Suicide) आत्महत्या केल्याचं वृत्त समोर आलं आहे. शनिवारी पोलिसांनी याबाबत माहिती दिली. पोलिसांनी सांगितलं की, 13 वर्षीय मुलीला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.
हे ही वाचा-Shocking! पोलीस चीफ केस कापण्यासाठी लागले मागे; जवानाने बंदुक काढली आणि...
सेक्टर 20 चे प्रभारी निरीक्षक मुनीष प्रताप सिंह यांनी सांगितलं की, सेक्टर 9 मध्ये राहणाऱ्या अल्पवयीन मुलीने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. कुटुंबीयांनी तिला फासावरुन खाली उतरवल्यानंतर जिल्हा रुग्णालयात नेलं, मात्र येथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. चौहान यांनी सांगितलं की, घटनेची सूचना मिळतात पोलीस घटनास्थळी पोहोचली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. त्यांनी सांगितलं की, चौकशीदरम्यान पोलिसांनी कळालं की मुलीचं तिच्या आईसोबत भांडण झालं होतं. मुलीला तिच्या आईने मोबाइलवर गेम खेळण्यास मनाई केली होती. यानंतर रागाच्या भरात तिने गळफास लावून घेतला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Game, Mobile Phone, Suicide