मोदींचा ड्रीम प्रोजेक्ट राज्य सरकारच्या रडारवर, उद्धव ठाकरेंच्या निर्णयावर लक्ष

मोदींचा ड्रीम प्रोजेक्ट राज्य सरकारच्या रडारवर, उद्धव ठाकरेंच्या निर्णयावर लक्ष

जपान सरकारच्या अर्थसहाय्याने केंद्र आणि राज्य सरकारच्या आर्थिक सहभागाने हा महाकाय बुलेट प्रकल्प सुरू करण्यात आला होता. मात्र, बुलेट ट्रनेला शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीनही पक्षांचा विरोध आहे.

  • Share this:

मुंबई, 02 डिसेंबर : राज्य सरकारने काल महाराष्ट्रातील सर्व विकास प्रकल्पांची सखोल माहीती श्वेतपत्रीकेद्वारे मागवली आहे. त्यामुळे केंद्र सरकारचा बहूचर्चित बुलेट ट्रेन प्रकल्प देखील आता राज्य सरकारच्या राडारवर आला आहे. जपान सरकारच्या अर्थसहाय्याने केंद्र आणि राज्य सरकारच्या आर्थिक सहभागाने हा महाकाय बुलेट प्रकल्प सुरू करण्यात आला होता. मात्र, बुलेट ट्रनेला शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीनही पक्षांचा विरोध आहे. त्यामुळे या प्रकल्पाबाबत आता महाविकासआघाडीचं सरकार काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.

बुलेट ट्रनेसाठी राज्य सरकार खर्च करणार असलेले हजारो कोटी रुपये शेतकऱ्यांसाठी वळवता येऊ शकातात. असा विचार सध्या राज्य सरकार करत असल्याची माहीती मिळतेय. त्यामुळे बुलेट ट्रेन प्रकल्पातून जर राज्य सरकार बाहेर पडलं तर केंद्र विरुद्ध राज्य असा संघर्ष निर्माण होऊ शकतो. सत्तेवर येतात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कामाचा आढावा घ्यायला सुरूवात केली. देवेंद्र फडणवीसांच्या काळात अनेक पायाभूत कामांचे प्रोजेक्ट्स मुंबई आणि महाराष्ट्रात सुरू झालेत. त्यामुळे त्या सगळ्या प्रकल्पांचं काय होणार? राज्य सरकार त्यात बदल करणार का? केंद्राची मदत त्या प्रकल्पांना मिळेल का? असे अनेक प्रश्न आता विचारले जात आहेत.

मोठी बातमी - देवेंद्र फडणवीसांना धक्का, आणखी एका आमदाराने सोडली साथ

या सगळ्यावर उद्धव ठाकरे यांनी आरे मधल्या मेट्रोच्या कारशेड बांधकामाला स्थगिती दिल्याने चांगलीच चर्चा रंगली होती. त्यानंतर सगळ्यांचं लक्ष लागलंय ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रिम प्रोजेक्ट असलेल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाकडे. त्यावर उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिलं. विधिमंडळात पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, गेल्या 5 वर्षात आम्ही सत्तेत होतो. पण 5 वर्षात विकासकामं कधी, कुठे कशी झाली किती खर्च झाला याबाबत मी माहीती मागवली आहे. त्या सगळ्यांची श्वेतपत्रिका काढणार आहोत.काही विकासकामं ज्यांची तातडीने आवश्यकता नाही ते पाहत आहोत.

काही विकासकामं करणं गरजेचं आहे पण ती कामं रखडलेली आहे तेही पाहणार आहोत. हे फक्तं माझं सरकार नाही...तर तूमचं सर्वांचं सरकार आहे. सर्वसामान्यांचं हे सरकार आहे.बुलेट ट्रेन चा आढावा घेऊ, बुलेट ट्रेन अजूनही रद्द केली नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं.

इतर बातम्या - महाविकास आघाडीच्या कामाला सुरुवात, सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे ही मागणी

आरे करशेड व्यतिरिक्त मी मेट्रोच्या कोणत्याही कामाला विरोध केला नाही. आक्षेप असता तर मेट्रो अडवली असती. वृक्षतोड नाही तर त्यातील अनेक जीवांना धोका आहे. प्रत्येक जिल्ह्यात सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल उभारणार.खाते वाटपा संदर्भात आम्ही तीनही पक्ष अत्यंत समजूतीने चर्चा करून अंतीम खाते वाटप आम्ही जाहीर करू असंही त्यांनी स्पष्ट केलं.

 

Published by: Renuka Dhaybar
First published: December 2, 2019, 10:47 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading