Home /News /news /

इनरवेअरच्या ब्रॅण्डने किम कार्दशियनने लाँच केले ‘मास्क’, काही तासांतच गेले संपून!

इनरवेअरच्या ब्रॅण्डने किम कार्दशियनने लाँच केले ‘मास्क’, काही तासांतच गेले संपून!

Skims हा ब्राण्ड पुरुष आणि स्त्रियांमध्ये चांगलाच लोकप्रिय आहे. त्याच ब्रॅण्डचा वापर करत किमने पाच प्रकारचे मास्क बाजारात आणले आहेत.

  लॉस एन्जलीस 19 मे: हॉलिवूडची ‘ड्रामा क्वीन’ अशी ओळख असलेली अभिनेत्री किम कार्दशियन ही कायम चर्चेत राहते. बोल्ड समजली जाणारी किम आपल्या बिनधास्त पणासाठी प्रसिद्ध आहे. चित्रपटांव्यतिरिक्त तिचा इनरवेअरचा Skims हा ब्रॅण्ड अमेरिकेत चांगलाच प्रसिद्ध आहे. याच ब्रॅण्डच्या नावाने किमने दररोज वापरण्याठी मास्क बाजारात आणले आहेत. Skimsहे मास्क लाँच होताच काही तासांमध्ये लोकांनी ते ऑनलाइन खरेदी केले. Skims हा ब्राण्ड पुरुष आणि स्त्रियांमध्ये चांगलाच लोकप्रिय आहे. त्याच ब्रॅण्डचा वापर करत किमने मास्कची चेनच बाजारात आणली.  Sand, Clay, Sienna, Cocoa आणि Onyx या पाच विविध आकर्षक रंगांमध्ये हे मास्क उपलब्ध आहेत. खास पद्धतीने हे मास्क तयार करण्यात आले असून दररोज वापरण्यासाठी ते आरामदायक आणि पुन्हा पुन्हा वापरता येण्याजोगे आहेत. Skimsचे मास्क आहेत म्हटल्यानंतर सगळ्यांनीच ते खरेदी करण्याची ऑनलाईन झुंबड केली आणि हातोहात मास्क संपूनही गेलेत. आता लवकरच नवे मास्क येतील असं त्यांनी सांगितलं आहे.
  दरम्यान, जगभर धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनाव्हायरसला रोखण्यासाठी जगभर संशोधन सुरू आहे. अनेक देशांनी संशोधनात निर्णयाक प्रगती केल्याचा दावा केला आहे. असं असतानाच चीनच्या एका लॅबोरेटरीनेही कोरोनाला रोखणारं औषध तयार केल्याचा दावा केला आहे. जगप्रसिद्ध पेकिंग युनिव्हर्सिटीच्या संशोधन करणाऱ्या लॅबोरेटरीने हा दावा केला आहे. जानेवारी महिन्यात या औषधाचं परिक्षण करण्यात आलं होतं ते यशस्वी ठरलं असा दावाही या लॅबच्या तज्ज्ञांनी केला आहे. Super Spreader: ‘तो’ चर्चमध्ये प्रार्थनेला गेला आणि 180 जणांना कोरोना देऊन आला AFP ने याबाबतचं वृत्त दिलं आहे. या लॅबचे प्रमुख सॅन झी यांनी सांगितलं की या औषधाचा प्रयोग उंदरावर करण्यात आला होता. तो यशस्वी ठरला आहे. हे औषध उंदीराला दिल्यानंतर त्याच्यात कोरोनाला रोखणाऱ्या Antibody’s तयार झाल्यात. त्यामुळे हा प्रयोग यशस्वी ठरला आहे. Lockdownनंतर लहान मुलांची होईल भयानक अवस्था; नोबेल विजेत्यांनी व्यक्त केली चिंता
   कोरोना व्हायरसवर अजुन औषध सापडलेलं नाही. मात्र या औषधामुळे व्हायरसला रोखता येतं असा त्यांचा दावा आहे. शरीरात Antibody’s तयार झाल्यामुळे पेशी अतिशय चांगल्या पद्धतीने कोरोना व्हायरसचा मुकाबला करू शकतात. त्यामुळे रुग्ण लवकरातलवकर बरा होण्याची शक्यता असतो. जगभर अशा पद्धतीने Antibody’s तयार करण्यासाठीही संशोधन सुरू आहे.
  Published by:Priyanka Gawde
  First published:

  पुढील बातम्या