News18 Lokmat

डोंबिवली स्टेशन रोड झाला दारूचा अड्डा, रस्त्यावर तळीरामांचा उच्छाद

जेव्हा डोंबिवली स्टेशवरुन पूर्वेकडे बाहेर पडता तेव्हा एकीकडे गर्दी आणि दुसरीकडे रस्त्यावर लोळणारे तळीराम हे चित्र रोजचं झालंय.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Apr 3, 2018 12:19 PM IST

डोंबिवली स्टेशन रोड झाला दारूचा अड्डा, रस्त्यावर तळीरामांचा उच्छाद

डोंबिवली, 03 एप्रिल : पूर्वेतील रेल्वे स्थानक परिसरात फेरीवाल्यांनी रस्त्यावर कब्जा केलाय तर दुसरीकडे आता डोंबिवली स्टेशन रोड चक्क दारूचे अड्डे झाले आहे. रस्त्यावरच बिनधास्तपणे दारू रिचवली जात आहे.

महाराष्ट्राची उप सांस्कृतिक राजधानी डोंबिवलीकडे पाहिलं जातं. जेव्हा डोंबिवली स्टेशवरुन पूर्वेकडे बाहेर पडता तेव्हा एकीकडे गर्दी आणि दुसरीकडे रस्त्यावर लोळणारे तळीराम हे चित्र रोजचं झालंय. स्टेशनच्या पूर्वला लागून असलेल्या स्काॅयवाॅकच्या खाली मद्य विक्रीची आणि देशी दारूची दुकान थाटली आहे. त्यामुळे तळीरामांनी कोणतीही लाज न बाळगता बिनधास्तपणे रस्त्यावर ठाणं मांडलंय. त्यांच्या जोडीला रस्त्यावरच नॉन व्हेजच्या हात गाड्या आहेत. ह्या हात गाड्यावर बिनधास्तपणे दारू प्यायला दिले जाते. साधारण: ८ वाजल्यानंतर या रोडवर वरून महिला जाण्यास टाळतात. दारू पिऊन दंगा करणे, महिलांची छेड काढणे असे प्रकार होत असल्याने भीतीपोटी डोंबिवलीकर महिला येथून जाण्यास टाळतात.

गेल्या अनेक महिन्यान पासून स्टेशन रोड दारूचे अड्डे झाले आहेत पण महापालिका अधिकारी आणि पोलीस याकडे दुर्लक्ष करत असल्याचं समोर आलंय. विशेष म्हणजे स्टेशन परिसरात फेरीवाले बसू नये असे आदेश असतानाही हातगाड्यांनी कब्जा केलाय.

डोंबिवलीमधील काही जागरूक महिलांनी ही गोष्ट न्यूज 18 लोकमतच्या निदर्शनास आणून दिली. पण भीती पोटी कॅमेरा समोर बोलण्यास नकार दिला. या तळीरामांवर आणि हातगाड्यांवर कारवाई करून त्याचा कायमचा बंदोबस्त करावा अशी मागणी या महिलांनी केलीये.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 3, 2018 12:19 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...