जुन्नर, 27 डिसेंबर : इमानदार प्राणी म्हणून कुत्रा (श्वान) ओळखला जातो. स्वतःचा जीव धोक्यात घालून संकटसमयी मालकाचे रक्षण पाळीव श्वानाने (Dog) केल्याच्या अनेक घटना ऐकिवात आहेत, पण आपल्या पाळीव श्वानासाठी मालकाने स्वतःचा जीव धोक्यात घातल्याची घटना दुर्मीळ आहेत. त्यातही बिबट्याच्या (Leopard) पट्यात अशी एखादी घटना घटने तेव्हा तिची चर्चा मात्र होतेच.
जुन्नर तालुक्यातील कांदळी येथील अशोक बढे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी शनिवारी 26 डिसेंबर रोजी पहाटे स्वतःचा जीव धोक्यात घालून बिबट्याच्या जबड्यातून आपल्या डॉबरमॅन जातीच्या पाळीव श्वानाची सुटका केली आहे. पहाटे पाच वाजता कांदळी येथील अशोक बढे यांच्या डॉबरमॅन जातीच्या पाळीव श्वानावर बिबट्याने हल्ला चढविला. श्वानानेसुद्धा बिबट्यावर प्रतिहल्ला चढविला. यावेळी झालेल्या आवाजामुळे अशोक बढे, सुभाष बढे, प्रवीण बढे यांना जाग आली. बढे कुटुंबीयांनी आरडाओरडा केला, पण बिबट्याने श्वानाची मान पकडली होती. त्यामुळे त्याची सुटका करण्यासाठी अशोक बढे आणि इतरांनी प्रयत्न केला.
बॉलिवूडमधील पदार्पणाआधीच शाहरुखच्या मुलीचा सोशल मीडियावर जलवा
हातात काठ्या घेऊन बिबट्याचा सुमारे दोनशे मीटर पाठलाग केला. फटाके वाजवल्यामुळे श्वानाची मान सोडून बिबट्या उसाच्या शेतात पसार झाला. मात्र, श्वानाच्या मानेत दात घुसल्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला आहे, अशी माहिती बढे यांनी दिली. वन विभागाच्या पशुवैद्यकीय डॉक्टरांनी दुपारी कांदळी गाठले. श्वानावर उपचार सुरू असून मानेतून सुरू असलेला रक्तस्राव थांबला आहे.
'मागील वर्षी बिबट्याच्या हल्ल्यात आमचा जर्मन शेफर्ड जातीचा श्वान ठार झाला आहे. डॉबरमॅनने या पूर्वी बिबट्याचा हल्ला परतवून लावला होता. श्वानाला वाचवण्यासाठी लाखो रुपये खर्च करण्याची आमची तयारी आहे', अशी माहिती संकेत बढे यांनी दिली.
मलायका अरोराची बॉयफ्रेंडसोबत भटकंती; फिरण्यासाठी निवडलं हे रोमँटिक ठिकाण
जुन्नर तालुक्याच्या मध्य बागायती भागात बिबट्याची संख्या वाढली आहे. ऊस तोडणी सुरू झाल्याने बिबटे सैरभैर झाले आहेत. बिबट्याच्या हल्ल्याच्या रोज घटना घडत आहेत. मात्र, पिंजरा लावण्याच्या पलीकडे वन विभागाकडून कोणतीही ठोस उपाय योजना केल्या जात नाहीत. बिबट्याची संख्या नियंत्रित करण्यासाठी वन विभागाकडून ठोस उपाययोजना न केल्यास पुढील काळात बिबटे आणि शेतकरी यांच्यात संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.