इंदापूरमध्ये 3 हजार 500 फुटांवरून कोसळलं विमान, पायलट जखमी

इंदापूरमध्ये 3 हजार 500 फुटांवरून कोसळलं विमान, पायलट जखमी

स्थानिकांच्या मदतीने शिकाऊ पायलट सिध्दार्थ टायटस यास रूई इथल्या खाजगी रुग्णालयातत प्राथमिक उपचार करून बारामती इथं उपचारासाठी हलवण्यात आलं आहे.

  • Share this:

इंदापूर, 05 फेब्रुवारी : इंदापूर तालुक्यातील रूई इथं शिकाऊ विमान कोसळलं आहे. यात पायलट जखमी झाला आहे. श्री बाबीर विद्यालयनजीक दुपारी बारा ते सव्वा बारावाजण्याच्या सुमारास बारामतीचं शिकाऊ विमान कोसळलं. विमानाच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघड झाल्यामुळे ३५०० फुट उंचीवरून विमान कोसळून शिकाऊ पायलट जखमी झाला आहे.

स्थानिकांच्या मदतीने शिकाऊ पायलट सिध्दार्थ टायटस यास रूई इथल्या खाजगी रुग्णालयातत प्राथमिक उपचार करून बारामती इथं उपचारासाठी हलवण्यात आलं आहे. घटना घडताच गावकऱ्यांनी आणि स्थानिकांनी घटनास्थळी गर्दी केली. स्थानिकांच्या तातडीच्या मदतीमुळे पायलटचा जीव थोडक्यात बचावला आहे.

दरम्यान, स्थानिकांकडून घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पक्ष दाखल झालं. त्यांच्याकडून विमानाचे तुकडे बाजूला हटवण्याचं काम सुरू आहे. तर या प्रकारासंबंधी पोलीस प्रत्यक्षदर्शींची चौकशी करत आहेत.

सुदैवाने या भीषण अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही. पण विमानाचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. तर पायलटवर रुग्णालयात उपचार सुरू आहे.

तर, गेल्या काही दिवसांआधी बेंगलुरू येथे मिराग 2000 प्रशिक्षणार्थी लढाऊ विमान कोसळल्याने एका पायलटचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या दुर्घटनाग्रस्त विमानात तिघेजण होते. त्यापैकी दोन पायलटना वाचवण्यात यश आले होतं. लढाऊ विमान कोसळल्याची दुर्घटना बेंगलुरू येथील एचएएल विमानतळावर घडली होती. विमान जमिनीवर कोसळताच त्याला आग लागली होती. आगीमुळे परिसरात धुराचे लोळ पसरले होते. यापूर्वी 28 जानेवारीला देखील उत्तर प्रदेशात लढाऊ विमान कोसळल्याची घटना घडली होती. मात्र सुदैवाने त्या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नव्हती.

Special Report : ऑनलाईन बँकिंग कराताना सावधान! या एका गोष्टीमुळे होईल मोठं नुकसान

First published: February 5, 2019, 2:07 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading