काश्मिरात शहीद झालेले कर्नल आशुतोष यांनी आईसाठी लिहिलेली शेवटची कविता, वाचून तुमचेही डोळे पाणावतील

काश्मिरात शहीद झालेले कर्नल आशुतोष यांनी आईसाठी लिहिलेली शेवटची कविता, वाचून तुमचेही डोळे पाणावतील

त्यांनी वर्षभरापूर्वी आपल्या आईची भेट घेतली होती. आईच्या आठवणीत 28 एप्रिल रोजी एक कविता लिहिली होती

  • Share this:

नवी दिल्ली, 4 मे : जम्मू-काश्मीरच्या (Jammu Kashmir) कुपवाडा जिल्ह्यातील हंदवाडा या भागात काल दोन अधिकाऱ्यांसह 5 जवान शहीद झाले. हे पाच सुरक्षाकर्मी दहशतवाद्यांविरोधात लढाई देत स्थानिकांना बाहेर काढण्याच्या ऑपरेशनमध्ये होते. यामध्ये कर्नल आशुतोष शर्मादेखील होते. दहशतवाद्यांशी दोन हात करताना त्यांना वीरमरण आलं. मातृभूमीसाठी त्यांनी आपल्या प्राणाचं बलिदान केलं.

शर्मा हे उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथे राहणारे होते. ते 21 राष्ट्रीय रायफल्स कमांडिंग अधिकारी होते. 28 एप्रिल रोजी त्यांनी आपल्या आईसाठी एक कविता लिहिली होती. त्यांची ती कविता वाचून तुम्हीही भावूक व्हाल. त्यांनीही ही कविता हिंदीतून लिहिली आहे. त्याचा पुढीलप्रमाणे केलेला मराठी अनुवाद -

ती नेहमीच घर सांभाळते, आवरत राहते

माझी आई मी येण्याची वाट पाहत राहते

परतेन मीदेखील एक दिवशी एखाद्या पक्ष्याप्रमाणे

ती अनेकदा या आशेनेच दिवस रेटत राहते

तिला भेटून आता एक वर्ष लोटलं, मात्र

तिच्या बोलण्यात मी देशासाठी लढत असल्याचा स्वाभिमान झळकतो

द लल्लन टॉप या वेबसाइटने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे. ही कविता वाचताना असं दिसून येईल की कर्नल आशुतोष केवळ कर्मवारी व साहसी नव्हे तर ते अत्यंत हळवेदेखील होते. दहशतवाद्यांशी लढाई करताना काल कर्नल आशुतोष शहीद झाले. वर्षभरापूर्वी त्यांनी त्यांच्या आईची भेट घेतली होती. आईच्या प्रेमासाठी लिहिलेलं हे पत्र वाचून डोळ्यात पाणी तरळेल.

संबंधित-परदेशात अडकलेले भारतीय लवकरच पोहोचणार मायदेशी, केंद्र सरकारकडून नियमावली जाहीर

गेल्या 36 तासांत तीन हल्ले, दहशतवाद्याचा खात्मा करताना CRPF चे 3 जवान शहीद

 

 

First published: May 4, 2020, 10:36 PM IST

ताज्या बातम्या