जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांचा खात्मा, काश्मीर पोलिसांना मोठं यश

जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांचा खात्मा, काश्मीर पोलिसांना मोठं यश

मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांचा खात्म करण्यात काश्मीर पोलिसांना यश आलं आहे. सर्च ऑपरेशन करून पोलिसांनी दहशतवाद्यांचा खात्मा केला. विशेष म्हणजे 6 महिन्यांतर पहिलं दहशतवाद्यांविरोधात मोहीम सुरू करण्यात आली आहे.

  • Share this:

श्रीनगर, 25 जानेवारी:  काश्मीरमधील अवंतीपुरात जम्मू-काश्मीर पोलिसांनी दहशतवाद्यांविरोधात मोहीम सुरू केली आहे. दहशतवाद्यांचा शोध सुरू असताना पोलिसांना जैश-ए-मोहम्मदचे तीन दहशतवादी अवंतीपुरात असल्याची माहिती मिळाली. माहितीवरून पोलिसांनी अवंतीपुरात दहशतवाद्यांना शोधण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरू केलं. पोलिसांच्या सर्च ऑपरेशनमध्ये जैश-ए-मोहम्मदचे तीन दहशतवादी परिसरात लपले असल्याची माहिती मिळाली. त्यात जैश-ए-मोहम्मदचा कमांडर असल्याचं समोर आलं. त्यानंतर परिसराची पोलिसांकडून घेराबंदी करण्यात आली. पोलिसांच्या गोळीबारीत दोन दहशतवादी ठार झालेत.

पोलिसांना मिळालं मोठं यश

पोलिसांनी काश्मीरमधील दोन क्रूर दहशतवाद्यांना ठार केलं आहे. त्यात जैश-ए-मोहम्मदच्या एका कमांडरचा समावेश आहे. काश्मीर पोलिसांनी दहशतावाद्यांविरोधात मोहिम तीव्र केली आहे. अवंतीपुरात लपून बसलेल्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यसाठी पोलिसांनी जोरदार फायरिंग केली. दहशतवाद्यांकडूनही पोलिसांवर फायरिंग करण्यात आली.  पोलिसांच्या फायरिंगमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे. तर इतर दहशतावद्यांचा शोध परिसरात पोलिसांकडून सुरू आहे. अद्यापही परिसरात सर्च ऑपरेशन सुरू आहे.

काही दिवसांपूर्वी मोस्ट वॉन्टेड दहशतवादी ठार

काश्मीर पोलिसांनी काही दिवसांपूर्वीच जैश-ए-मोहम्मदच्या मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याला ठार केलं होतं. त्याची काश्मीर खोऱ्यात मोठी दहशत होती. त्यानं अनेक हत्या आणि केल्या होत्या. त्याच्यावर अपहरणाचेही अनेक गुन्हे दाखल आहे. त्यानं अनेकांना घाटी सोडून जाण्याची धमकी दिली होती. मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याचा खात्मा पोलिसांनी केल्यानं परिसरातील नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला आहे.  दहशतवाद्यांची गुप्त माहिती पोलिसांना खबऱ्यांकडून मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी सर्च ऑपरेशन करून दहशतवाद्यांचा खात्म केला आहे.

6 महिन्यानंतर दहतवाद्यांविरोधात ऑपरेशन

काश्मीर खोऱ्यातील दहशतवाद्यांविरोधात गेल्या काही महिन्यांपासून एकही ऑपरेशन झालं नव्हतं. मात्र सीमेवर आणि काश्मीर खोऱ्यात पोलीस आणि जवान डोळ्यात तेल खालून सक्रीय होते.  गेल्या 5 ऑगस्टपासून काश्मीर खोऱ्यात दहशवाद्यांविरोधात ऑपरेशन झालं नाहीये. ऑगस्ट 2019 नंतर दहशतवाद्यांविरोधात पोलिसांचं हे पहिलं ऑपरेशन आहे. त्यामुळं आता जवानासह जम्मू काश्मीर पोलीस दहशतवाद्यांविरोधात सक्रीय झाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 25, 2020 07:44 PM IST

ताज्या बातम्या