आपल्या महाराष्ट्रात पोहोचताच 2 वर्षांच्या लेकीसमोर बापाने सोडला जीव, ग्रीन झोन जिल्हा हादरला

आपल्या महाराष्ट्रात पोहोचताच 2 वर्षांच्या लेकीसमोर बापाने सोडला जीव, ग्रीन झोन जिल्हा हादरला

गडचिरोलीत एकही कोरोनाबाधित रुग्ण नसल्याने तेलंगणातून आलेल्या इसमाचा महाराष्ट्राच्या हद्दीत दाखल होताच मृत्यू झाल्याने प्रशासकीय यंञणा हादरली.

  • Share this:

गडचिरोली, 17 मे : लॉकडाउनमध्ये अडकलेले लाखो मजूर पायपीट करत महाराष्ट्रातून आपल्या जिल्ह्याकडे निघाले आहे. परंतु, शेकडो किमी प्रवास करून महाराष्ट्रात राहणारा मजूर कसाबसा आपल्या राज्यात पोहोचला पण दुर्दैवाने आपल्या 2 वर्षांच्या लेकीसमोर त्याचा मृत्यू झाला. ग्रीन झोन असलेल्या गडचिरोलीत ही घटना घडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

सिरोंचा तालुक्यातील रामंजापूर येथील एक मजूर दाम्पत्य मजुरीच्या कामासाठी तेलंगणाच्या करीमनगर इथं गेलं होतं. परंतु, लॉकडाउनमुळे हे दाम्पत्य जिल्ह्याची सीमा बंद असल्यामुळे अडकून पडले होते.  तिथं मजुरीसाठी काम करत असताना मागील महिन्यात 5 एप्रिलपासून या मजुराची प्रकृती बिघडली होती. त्यांच्यावर करीमनगर इथं एका खासगी रुग्णालयात उपचार झाले होते.

हेही वाचा -... आणि पायी चालत जात राहुल गांधी यांनी घेतली मजुरांची भेट

आज सकाळी या कुटुंबाने आपल्या गावी परतण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर खासगी वाहनाने प्राणहीता नदीच्या पुलावरील तेलंगणाच्या सीमेपर्यंत हे पोहचले. मृतक मजूर त्याची पत्नी, चौदा वर्षाचा मुलगा आणि दोन वर्षाची मुलगी हे सगळे पोहचले. तिथ धर्मपुरी येथील नाकाबंदीवर त्यांना उतरवून ते वाहन तेलंगणात परत गेले. त्यानंतर प्राणहीता नदीच्या पुलावरुन हे चौघे पायी महाराष्ट्राच्या हद्दीत दाखल झाले होते.

धर्मपुरी येथील शासकीय आश्रमशाळेजवळ येताच या मजुराला अस्वस्थ वाटू लागल्याने चौघे तिथे थांबले. काही कळायच्या आताच अचानक या मजुराचा मृत्यू झाला. गडचिरोली जिल्ह्यात एकही कोरोनाबाधित रुग्ण नसल्याने तेलंगणातून आलेल्या इसमाचा महाराष्ट्राच्या हद्दीत दाखल होताच मृत्यू झाल्याने प्रशासकीय यंञणा हादरली.

हेही वाचा -कोरोनानंतर आता पावसानं ओढावलं संकट, मुंबईत एकाचा मृत्यू तर 7 कुटुंब उघड्यावर

सिरोंचा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजय अहीरकर यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले तर वैद्यकीय यंञणा आश्रमशाळेजवळ पोहचली. तिथे मृतदेह आश्रमशाळेजवळ पडून होता. पोलिसांनी कुणालाही जवळ जाऊ दिले नाही. पोलिसांनी तेलंगणाच्या ज्या भागातून हा मजुर आला आहे. तेथील परिस्थितीची माहिती घेतली तिथे सध्या तरी एकही कोरोनाबाधित रुग्ण नाही.

या मजुराला यकृताचा आजार असल्याचे वृत्त आहे. माञ, तरीही मृतकासह त्याच्या कुटुंबीयाचे स्वॅब घेऊन कोरोनाची चाचणी करुन तपासणी पाठवण्यात येणार आहे. जिल्हा ग्रीन झोनमध्ये आहे. त्यामुळे प्रशासकीय यंञणा सतर्कता बाळगत आहे.

संपादन - सचिन साळवे

First published: May 17, 2020, 8:57 AM IST
Tags:

ताज्या बातम्या