...आणि चक्क कपिल शर्माने पूजा सावंतला दिला नकार

...आणि चक्क कपिल शर्माने पूजा सावंतला दिला नकार

या शोचा टीझर व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये विद्युत आणि कपिल एकमेकांचं मनोरंजन करताना दिसत आहेत.

  • Share this:

मुंबई- 23 मार्च- ‘द कपिल शर्मा शो’च्या रविवारच्या भागात ‘जंगली’ सिनेमाची टीम येणार आहे. यावेळी विद्युत जामवाल, पूजा सावंत आणि आशा भट ही हजर होते. या शोचा टीझर व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये विद्युत आणि कपिल एकमेकांचं मनोरंजन करताना दिसत आहेत.

यानंतर किकू शारदा स्टेजवर येतो आणि विद्युतला म्हणतो की, ‘आतापर्यंत विद्युतला टीव्हीवर आणि सोशल मीडियावर येणाऱ्या व्हिडिओमध्ये स्टंट करताना पाहिले आहे. पण समोरा समोर असं करताना पाहिलं नाही.’

यानंतर विद्युत स्टेजवर असा काही स्टंट करून दाखवतो की त्याला स्टँडिंग ओव्हेशन मिळतं. सुरुवातीला विद्युत स्वतःला चार काचेच्या बाटल्यांवर उभं करतो आणि पुश- अप्स मारायला सुरुवात करतो. यानंतर तो बाटल्यांची संख्या कमी करत दोन बाटल्यांवर उभा राहतो.

आपल्या डोळ्यांसमोर विद्युतला स्टंट करताना पाहून अर्चना पूरण सिंगतर थक्कचं झाली होती. अर्चनाने त्याच्या या स्टंटला स्टँडिंग ओव्हेशन दिलं. तिच्यासोबत प्रेक्षकांनीही टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचं कौतुक केलं. विद्युत जामवाल हा जगातल्या सर्वोत्कृष्ट सहा मार्शल आर्टिस्टपैकी एक आहे. त्याच्या प्रत्येक सिनेमात तो स्वतःचे स्टंट स्वतः करतो.

यानंतर कपिल पूजा आणि आशा यांच्याशी थट्टा करताना दिसतो. यावेळी कपिल पूजाला सरळ सांगून टाकतो की त्याने आशाला तिच्यासोबत जाण्याचं वचन दिल्यामुळे तो पूजासोबत येऊ शकत नाही. यावर पूजाचा चेहरा पाहण्यासारखा आहे.

विद्युतच्या आगामी सिनेमाबद्दल बोलायचे झाले तर, जंगली हा सिनेमा २९ मार्चला प्रदर्शित होणार आहे. ४५ कोटी रुपयांच्या बजेटमध्ये या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. जंगली पिक्सर्सच्या बॅनरअंतर्गत तयार झालेल्या या सिनेमाचं दिग्दर्शन चक रसेल यांनी केले आहे.

First published: March 23, 2019, 7:02 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading