रुग्णवाहिका घेऊन जखमी आरटीआय कार्यकर्त्याचा पोलीस ठाण्यात ठिय्या

रुग्णवाहिका घेऊन जखमी आरटीआय कार्यकर्त्याचा पोलीस ठाण्यात ठिय्या

डोंबिवली येथील आरटीआय कार्यकर्ते महेश निंबाळकर यांच्यावर दोन महिन्यापूर्वी काही अज्ञात गुंडांनी जीवघेणा हल्ला केला होता

  • Share this:

06 जून : डोंबिवली येथील आरटीआय कार्यकर्ते महेश निंबाळकर यांच्यावर दोन महिन्यापूर्वी काही अज्ञात  गुंडांनी  जीवघेणा हल्ला  केला होता. मात्र, यातील दोन आरोपींना अटकपूर्व जामीन मिळाला होता तर अन्य आरोपींना अद्याप अटक करण्यात आली नसल्याने जखमी निंबाळकर यांनी मंगळवारी रुग्णवाहिके सकट रामनगर पोलीस ठाण्याच्या परिसरात ठिय्या मांडला. मध्ये महेश यांच्या परिवाराने आणि मित्र शामिल    झाले होते.

निंबाळकर यांना त्यांच्या कार्यालयात  घुसून काही अज्ञात गुंडांनी त्यांना बेदम मारहाण केली होती. यात ते गंभीर जखमी झाले होते. मात्र, या घटनेतील आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती न लागल्याने निंबाळकर यांनी कुटुंबासह पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला होता. याबाबत पोलिसांनी निंबाळकर यांच्याशी चर्चा करून लवकरच या प्रकरणाची कोर्टात लवकरच तारीख असून यावर तोडगा काढला जाईल असं आश्वासन दिल्यावर ठिय्या मागे घेतला अशी माहिती  निंबाळकर यांनी दिली.

First published: June 6, 2017, 9:55 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading