Home /News /news /

शूटर ते शूटआऊटपर्यंत; सिद्धू मुसेवाला हत्येमागे पुण्याच्या महाकालचा महत्त्वाचा रोल, वाचा Inside Story

शूटर ते शूटआऊटपर्यंत; सिद्धू मुसेवाला हत्येमागे पुण्याच्या महाकालचा महत्त्वाचा रोल, वाचा Inside Story

स्पेशल सेलकडून आज पत्रकार परिषद घेत सिद्धू मुसेलावाच्या (Siddhu Moosewala Case) हत्या प्रकरणात महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे.

    नवी दिल्ली, 10 जून : पंजाबी गायक आणि काँग्रेसचे नेते सिद्धू मूसेवाला (punjabi singer sidhu moosewala) याच्या हत्येचा तपास दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलकडून घेतला जात आहे. दरम्यान स्पेशल सेलकडून आज पत्रकार परिषद घेत सिद्धू मुसेलावाच्या (Siddhu Moosewala Case) हत्या प्रकरणात महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. यावेळी दिल्ली पोलिसांच्या स्पेशन सेलने सांगितलं की, सिद्धू मुसेवाला हत्या  प्रकरणात तपास सुरू आहे. दरम्यान (identified 6 shooters ) सहा शूटर्सची ओळख पटवण्यात आली असून 4 जणांची भूमिका निश्चित करण्यात आली आहे. लॉरेन्स बिश्नोई यानेच ही हत्या रचली होती. विशेष म्हणजे पुण्याच्या महाकालने या 2 शूटरची ओळख करून दिली होती. पंजाबी गायक आणि काँग्रेसचे नेते सिद्धू मूसेवाला (punjabi singer sidhu moosewala) यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याच्या घटनेला आता आठवडा उलटला आहे. या प्रकरणात नवनवीन खुलासे होत आहेत. गायकाच्या हत्येची कबुली लॉरेन्स बिश्नोईने दिली होती. या हत्येचं महाराष्ट्र कनेक्शनही समोर आलं आहे (Maharashtra Connection with Moosewala's Murder). मूसेवालाच्या हत्येसाठी एकूण 8 शूटर बोलावण्यात आले होते. यात वेगवेगळ्या राज्यांमध्ये हे शूटर मागवण्यात आले होते. यामध्ये पुण्यातील दोन शूटरची नावं समोर आली आहेत. स्पेशल सेलचे विशेष आयुक्त एचजीएस धालीवाल यांनी याबाबत माहिती दिली होती. त्यानुसार, दिल्ली पोलिसांचे विशेष पथक यापूर्वीच अनेक गुंडांचा शोध घेत आहे. तसेच पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाची हत्या करण्यात आल्यानंतर या प्रकरणाचाही तपास करत आहे. यासाठी आमचे पथक आठ संशयित आरोपींची चौकशी करत आहे. आमच्या पथकाने तपासादरम्यान पाच आरोपींना ओळखले. यातील एक आरोपी सितेश हिरामण कमळे उर्फ ​​‘महाकाल’ याला संयुक्त कारवाईत पुण्यातून अटक करण्यात आली आहे. तसेच आमची टीम सध्या पुण्यात संयुक्तपणे आरोपींची चौकशी करत आहे. आरोपी महाकाल याचा खुनात सहभाग नव्हता. मात्र, खून करणाऱ्या शूटरशी त्याचे अतिशय जवळचे संबंध होते. दोघेही अनेक गुन्ह्यांमध्ये सामील होते. तसेच त्यांनी एकत्र अनेक खून केले आहेत. सिद्धू मूसेवाला यांनी गेल्या वर्षी पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 29 वर्षीय पंजाबी कलाकाराने मानसा मतदारसंघातून 2022 ची निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांचा आम आदमी पार्टीचे डॉ. विजय सिंगला यांच्याकडून पराभव झाला होता.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Punjab, Singer

    पुढील बातम्या