Home /News /news /

मुंबईच्या तरुणासोबत बांधली लग्नगाठ; हनिमूनच्या रात्री पतीच बिंग फुटलं, तरुणीची पोलिसात तक्रार

मुंबईच्या तरुणासोबत बांधली लग्नगाठ; हनिमूनच्या रात्री पतीच बिंग फुटलं, तरुणीची पोलिसात तक्रार

याच महिन्यात दाम्पत्याचं लग्न झालं होतं. दोघे हनिमूनला गेले होते. तेथे धक्कादायक प्रकार समोर आला.

    भोपाळ, 26 मे : मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh News) इंदूरमध्ये महिलांवरील गुन्ह्याच्या प्रमाणात सातत्याने वाढ होत असल्याचं दिसून येत आहे. अशीच एक घटना इंदूरच्या पोलीस ठाण्यातून समोर आली आहे. ही घटना इंदूरच्या नेहरू नगर येथे राहणाऱ्या पीडितेची आहे. येथील महिलेचं लग्न याच वर्षी मे महिन्यात मुंबईत राहणाऱ्या एका तरुणासोबत झालं होतं. (husband of the woman who went on honeymoon turned out to be impotent) यासाठी दोन्ही कुटुंबाचा पाठिंबा होता. लग्नासाठी नवरदेवाकडून बऱ्याच भेटवस्तू दिल्या होत्या. लग्नाच्या एक दिवसपूर्वी कुटुंबाकडून 5 लाख रुपयेही घेतले होते. पीडितेकडून मदतीची मागणी... लग्न झाल्यानंतर जेव्हा पती-पत्नी हनिमूनवर गेल्यानंतर कळालं की, पती नपुंसक आहेत. पीडितेने जेव्हा याबाबत आपल्या सासरी सांगितलं तर तिला मारहाण करण्यात आली आणि 10 लाख रुपये हुंड्यात मागू लागले आणि पीडितेला घराबाहेर काढलं. पीडितेने याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आणि न्यायाची मागणी केली. तपास अधिकाऱ्याने दिली माहिती... पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेने आपल्या पतीविरोधात तक्रार दाखल केली आहे. याशिवाय छोट्या-छोट्या गोष्टींवरुन मारहाण करणे आणि हुंड्यात 10 लाख रुपयांची मागणी कर बेदखल केल्याचं सांगितलं. ज्याच्या तक्रारीच्या आधारावर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस या प्रकरणात पुढील तपास करीत आहेत.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Crime news, Madhya pradesh, Wife and husband

    पुढील बातम्या