Home /News /news /

सप्तपदीपूर्वी नवरदेवाचं रुप पाहून नवरी हादरली; लग्नापूर्वीच वरात दिली पाठवून

सप्तपदीपूर्वी नवरदेवाचं रुप पाहून नवरी हादरली; लग्नापूर्वीच वरात दिली पाठवून

गोंधळ इतका वाढला की कोणीतरी पोलिसांना कळवलं. पोलीसही घटनास्थळी पोहोचले.

  लखनऊ, 21 मे : उन्नावमधील (Uttar Pradesh News) एका नवरीनेच आपल्या वरातीला परतायला सांगितल्याचा प्रकार समोर आला आहे. नवरीला जयामालादरम्यान कळालं की, नवरदेवाचे केस नकली आहेत. त्यामुळे मुलीने लग्नास स्पष्ट नकार दिला आणि वरातीला जाण्यास सांगितलं. नवरदेवाच्या केसांवरुन प्रकरण इतकं वाढलं की, पोलिसांना बोलवावं लागलं.

  बरेच प्रयत्न करून पोलिसांनी नवरीच्या कुटुंबीयांना समजावून शांत केलं आणि वरात पुन्हा पाठवून दिलं. ही घटना उन्नावमधील सफीपूर येथील आहे. येथे शुक्रवारी रात्री दिल्लीतून वरात आली होती. नवरीच्या पक्षाने वरातीचं स्वागत केलं. नाचत-वाजत वरात मुलीच्या दारात पोहोचली. यानंतर जयमालाचा कार्यक्रम सुरू झाला.

  डोक्यावरुन हात फिरवला आणि हातात आला विग... रात्री साधारण 10 वाजता नवरदेव पंकज आणि नवरी स्टेजवर पोहोचले. दोघांनी एकमेकांना हार घातला. त्यावेळी स्टेज फिरत होता. काही वेळ स्टेज फिरतच राहिला. यानंतर नवरदेव आणि नवरी स्टेजवरुन उतरू लागले. तेव्हाच नवरदेव पंकज बेशुद्ध होऊन खाली कोसळला. त्याला चक्कर आल्याची चर्चा सुरू झाली. यानंतर पाहुण्यांनी त्याला झोपवलं आणि चेहऱ्यावर पाणी मारलं. यावेळी नवरी तेथेच उभी होती. तिने नवरदेवाच्या डोक्यावरुन हात फिरवला आणि विग निघून आला. हे पाहताच नवरीला धक्काच बसला. यानंतर ती आरडा-ओरडा करू लागली. मुलीचे कुटुंबीय नवरदेवाला विगशिवाय पाहून हादरले.

  गोंधळ इतका वाढला की कोणीतरी पोलिसांना कळवलं. पोलीसही घटनास्थळी पोहोचले. परियार चौकीचे प्रभारी रामजीत यादव गेस्ट हाऊसवर पोहोचले. दोन्ही बाजूंनी समजावून सांगितल्यानंतर प्रकरण शांत झाले. वर पंकज सप्तपदी न घेता वरात घेऊन परतला. तो दिल्लीत राहतो आणि काम करतो. वधू एका खाजगी महाविद्यालयात शिक्षिका आहे.

  Published by:Meenal Gangurde
  First published:

  Tags: Bride, Bridegroom, Marriage

  पुढील बातम्या