विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी, वैद्यकीय प्रवेशातील 70:30 कोटा पध्दत रद्द होण्याची शक्यता

विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी, वैद्यकीय प्रवेशातील 70:30 कोटा पध्दत रद्द होण्याची शक्यता

याबाबत नुकतीच उपमुख्यमंत्री अजित पवार, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्या उपस्थितीत बैठक झाली.

  • Share this:

मुंबई, 9 सप्टेंबर : वैद्यकीय प्रवेशासाठी जात व प्रवर्गनिहाय आरक्षण असताना पुन्हा प्रादेशिक आरक्षणाची 70:30 कोटा पध्दत रद्द करून मराठवाडा व विदर्भातील वैद्यकीय प्रवेशासाठी धडपडणाऱ्या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांवर होत असलेला अन्याय थांबविण्यासाठी तत्कालीन विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे, आ. अमरसिंह पंडित, आ. सतिश चव्हाण यांच्या मागणीला यश मिळत असल्याचे दिसत आहे. राज्यातील एमबीबीएस सह वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेतील 70:30 कोटा पद्धत राज्य सरकार रद्द करत असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून कळले आहे. याबाबत नुकतीच उपमुख्यमंत्री अजित पवार, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्या उपस्थितीत बैठक झाली.

भाजप सेना युती सरकारच्या काळात वैद्यकीय प्रवेशासाठी जात व प्रवर्गनिहाय आरक्षण लागू असताना, पुन्हा प्रादेशिक आरक्षणाची जाचक अट लावण्यात आली, त्यामुळे मराठवाडा विभागातील विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप करण्यात आला. मराठवाड्यात केवळ 6 तर विदर्भात 9 शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आहेत; अशा परिस्थितीत 70:30 कोटा निर्माण करून प्रादेशिक आरक्षण लागू झाल्याने याचा फटका वैद्यकीय शिक्षणास प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विशेषकरून मराठवाडा व विदर्भातील विद्यार्थ्यांना बसत होता.

या पार्श्वभूमीवर सरकारने मराठवाडा व विदर्भातील विद्यार्थ्यांवर अन्यायकारक ठरणाऱ्या वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेतील 70:30 कोटा पद्धतीस रद्द करत अनेक वर्षांच्या या मागणीला हिरवा कंदील दिल्याचे समजते. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली, त्यामध्ये सकारात्मक निर्णय घेण्यात आले. येत्या एक दोन दिवसातच याबाबतची अधिकृत घोषणा होऊन शासन निर्णय जाहीर करण्यात येईल अशी विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे.

Published by: Akshay Shitole
First published: September 7, 2020, 5:42 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading