नवी दिल्ली, 6 सप्टेंबर : नागर विमान महानिदेशालयाने (DGCA) सुप्रीम कोर्टाला (Supreme Court) माहिती दिली आहे की, लॉकडाऊनदरम्यान बुक केलेल्या फ्लाइट तिकिटांचे संपूर्ण पैसे रिफंड केले जाणार आहे. हे रिफंड 25 मार्च ते 3 मे 2020 दरम्यान प्रवासासाठी काढलेल्या तिकिटांसाठी लागू होईल.
देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डानांची सर्व तिकीटं यामध्ये सामील असतील. DGCA कडून ही माहिती 13 जून रोजी कोर्टाच्या आदेशानंतर देण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टाने खासगी एअरलाइन्ससह नागर विमानन मंत्रालयाला (Ministry of Civil Aviation) आदेश दिला होता की ग्राहकांचे तिकीट रद्द केल्यानंतर त्यांला रिफंड करण्यासाठी काही मार्ग काढण्यात यावा. DGCA ने सांगितले की लॉकडाउन दरम्यान बुक केलेल्या तिकिटांचं रिफंड न करणे आणि ग्राहकांच्या इच्छेशिवाय क्रेडिट शेल तयार करणे हे नियमांचं उल्लंघन आहे. सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेत सांगण्यात आलं होतं की काही ग्राहक एक वेळेच्या आत क्रेडिट शेल वापर करण्यासाठी इच्छुक नाहीत. फ्लाइट रद्द झाल्यानंतर त्यांना पूर्ण रिफंड देण्यात यायाला हवं.
Supreme Court was informed by Directorate General of Civil Aviation (DGCA) that tickets booked by passengers in domestic and international carriers for air travel during the first two phases of lockdown between March 25 to May 3, 2020, will be 'fully refunded'. pic.twitter.com/27Pis2Yi1b
सांगितले जात आहे की केंद्र सरकारने एअरलाइन्सला तिकीट रद्द करण्याचे शुल्क न आकारता संपूर्ण पैसे रिफंड करण्यास सांगितले होते. 25 मार्च ते 14 एप्रिलपर्यंत बुक केलेल्या तिकीटांसाठी प्रवासाची तारीख 15 मार्च ते 3 मे दरम्यान असलेल्यांसाठी ही सूचना देण्यात आली होती. विमान कंपन्यांनी याचे पालन करावे यासाठी मंत्रालयाने नागर विमानन महानिदेशालयाकडून ही बाब तपासण्यास सांगितली होती.
31 ऑगस्ट रोजी केंद्र सरकारने इंटरनेशनल कमर्शियल पॅसेंजर फ्लाइटवरील बॅन 30 सप्टेंबरपर्यंत वाढवला आहे. सरकारने काही फ्लाइट्सना सूट दिली आहे. भारतात 25 मार्चपासून शेड्यूल इंटरनॅशनल फ्लाइट्स बंद आहे.