पैसे बुडवून विदेशात पळणाऱ्यांची आता खैर नाही, नव्या कायद्याला मंजूरी

पैसे बुडवून विदेशात पळणाऱ्यांची आता खैर नाही, नव्या कायद्याला मंजूरी

पैसे किंवा कर्ज बडवून विदेशात पळणाऱ्यांची आता खैर नाही. अशा लोकांविरोधात आत कडक कारवाई होणार आहे. याबाबतच्या नव्या विधेयकाला राज्यसभेने मंजुरी दिली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, ता. 25 जुलै : बाया आधी लोकसभेने हे विधेयक मंजूर केलं होतं. या नव्या कायद्यानुसार विदेशा पळून गेले तरी भारतीय कायद्यानुसार त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. त्याचबरोबर देश विदेशातली संपत्ती जप्त करण्याचे अधिकारही तपास यंत्रणांना देण्यात आले आहेत. सध्या अस्तित्वात असलेल्या कायद्यात अनेक पळवाटा होत्या. कर्जबुडव्या व्यक्ती दर विदेशात पळून गेला असेल तर त्याच्यावर कारवाई करण्यात अनेक अडचणी येत होत्या. त्याची संपत्ती जप्त करणं, चौकशी करणं अशा अनेक अडचणी होत्या मात्र आता या पळवाटा बंद झाल्याने नीरव मोदी आणि विजय मल्ल्या सारख्या धेंडांना पळून जावून अलिशान जीवन जगणं शक्य होणार नाही.

नारायण राणे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, मराठा आंदोलनावर करणार चर्चा

सेंट झेविअर्स कॉलेजच्या 150 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच मराठी प्राचार्य

100 कोटींपेक्षा जास्त पैसे बुडवून विदेशात पळून जाणं आणि आर्थिक गुन्ह्यात बसणारं कृत्य करणाऱ्या व्यक्तींना या नव्या कायद्यानुसार कायद्याच्या कचाट्यात आणलं जाणार आहे. कायदेशीर कारवाई होऊ नये यासाठी अशा व्यक्ती विदेशात पळून जात असतं. आणि कायद्याचा बडगा असल्याने त्या पुन्हा भारतात परत येत नव्हत्या. आता अशा व्यक्ती विदेशात असल्या तरी त्यांच्यावर भारतीय कायद्यानुसार खटला दाखल केला जावू शकतो.

चर्चा अर्जुन तेंडुलकरची, पण भाव खाल्ला अकोल्याच्या अर्थवने!

नागपूर अधिवेशनाच्या काळात विखे पाटलांना डेंग्यूची लागण

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 25, 2018 07:44 PM IST

ताज्या बातम्या