जर्काता, 22 जून : इंडोनेशियात रविवारी ज्वालामुखीच्या विस्फोटातून खूप मोठ्या प्रमाणात लावा बाहेर येऊ लागला. हा लावा 6 किलोमीटर उंचावर आकाशात पोहोचला. इंडोनेशियाच्या माऊंट मेरापी येथे ज्वालामुखीतून दोनदा लावा बाहेर आला.
सात मिनिटांच्या अंतराने येथे ज्वालामुखीचा दोन वेळा विस्फोट झाला. यानंतर त्या भागातून 6 किमी उंचीपर्यंत राख बाहेर येऊ लागली. ज्वालामुखीतून आलेल्या राखेमुळे आकाश ढगाळ झाले होते. शिवाय बरीच गावे अंधारमय झाली होती. या घटनेची माहिती मिळताच विमानांच्या उड्डाणांबाबत चेतावणी देण्यात आली. त्यांचे मार्ग बदलण्यात आले.
Indonesia's most volatile volcano Mount Merapi erupted today.
Merapi spewed ash and hot gas in a massive column as high as 3.7 miles on Sunday morning. pic.twitter.com/5lnpECmm6p
The volcano (2.930 m) has repeatedly erupted over the past two years.
Mount Merapi's warning status has been declared "caution" since 22 May 2018. Local residents are suggested to remain calm but stay alert with the 3-kilometer safe distance. pic.twitter.com/6zeehTQzvJ
माउंट मेरापी हा जगातील सर्वात सक्रिय ज्वालामुखी आहे. फ्रान्स 24 च्या मते, पश्चिमेला वारा वाहू लागला आणि त्यानंतर इंडोनेशियाच्या जावा बेटातील ज्वालामुखीजवळ राहणाऱ्या लोकांच्या 3 किमीच्या परिघात प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली.