Home /News /news /

शरीर सुखासाठी सुनेचा घेतला बळी; सासऱ्याच्या भयंकर कृत्याने गाव हादरलं!

शरीर सुखासाठी सुनेचा घेतला बळी; सासऱ्याच्या भयंकर कृत्याने गाव हादरलं!

हत्येमागील धक्कादायक (Shocking News) कारण समोर आलं आहे.

    भोपाळ, 22 जून : मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh News) सिंगरोली बरगवां येथील पोलिसांनी 24 तासांच्या आत एका तरुणीच्या हत्येचा खुलासा केला. या तरुणीची हत्या करणारा दुसरा-तिसरा कोणी नसून महिलेचा सासरा (Father in law killed) असल्याचं समोर आलं आहे. हत्येमागील धक्कादायक (Shocking News) कारण समोर आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार अवैध संबंधातून तरुणीची हत्या करण्यात आली. आरोपी सासरा हा सुनेला शरीर संबंधासाठी जबरदस्ती करीत होता. ती मात्र सासऱ्याला जुमानत नव्हती. या रागाच्या भरात सासऱ्याने सुनेची हत्या केली. हत्येच्या खुलाशानंतर पोलिसांच्या टीमने आरोपीला अटक केली आहे. दोन वर्षांपूर्वी तरुणीचं लग्न झालं होतं. सुनेला पाहून सासऱ्याची नियत बिघडली. गेल्या दोन वर्षांपासून तो दररोज सुनेला शरीर संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती करीत होता. सुनेने या घृणास्पद कामासाठी सासऱ्याला नकार दिला. या गोष्टीमुळे संतापलेल्या सासऱ्याने कुऱ्हाडीने सुनेची हत्या केली. पोलिसांच्या टीमने आरोपीला 24 तासांच्या आत पकडलं. या प्रकरणात सासऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई सुरू आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Madhya pradesh, Murder

    पुढील बातम्या