दापोली, 25 एप्रिल : राज्यात सर्वत्र कोरोनाने (Maharashtra Corona) हाहाकार माजला आहे. कोरोनाने मृत्यू झाल्यानंतर प्रेत नाकारत असल्याच्या घटनांमुळे माणुसकी हरविल्याचे पाहायला मिळत आहे. तर दापोलीत (Dapoli) कोरोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तीला स्मशानभूमीत नगरपंचायत कर्मचाऱ्याकडून अग्नी देण्यात आली. अग्नीनंतर अस्थी घेऊन जाण्यास नातेवाईकांना सांगन्यात आले परंतु, आम्हाला 'बाबांची अस्थी नको' म्हणत मुलाने नकार दिला व नातेवाईकांनी काढता पाय घेतला.
मृत्यूनंतर त्यांच्या अस्थी पूजन व विसर्जन केल्या शिवाय मोक्ष मिळत नाही, असं हिंदू धर्मात बोललं जाते. परंतु, कोरोनाच्या भीतीने अंत्यसंस्कारा नंतर सुद्धा नातेवाईक मंडळी अस्थी नाकारत असल्याचे वास्तव समोर आले आहे. मृत्यूपश्चात होणाऱ्या विधीसाठी हिंदू धर्मात अस्थीला फार महत्व आहे. स्मशानात पीपीई किट घालून, काही लोक आई, वडील किंवा इतर मंडळींना प्रथेप्रमाणे शेवटीची इच्छा पूर्ण करण्यासाठी अग्नी दिला जातो. परंतु, कोरोनाची भीती माणसाच्या मनात घर करून बसली आहे. मृत्यूपश्चात सुद्धा काही महत्त्वाच्या विधी असतात त्याच विधी करण्यासाठी आता नात्यातील मंडळी समोर येत नसल्याचे पाहायला मिळत आहे.
खळबळजनक! पुण्यातील NCPच्या आमदाराला हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याची होती योजना
दापोली स्मशानभूमीत कोरोनाबाधित रुग्णावर नगरपंचायतीच्या सफाई कर्मचाऱ्यांनी अंत्यसंस्कार केले, त्यानंतर तुम्हाला हवे असतील तर अस्थी घेऊन जाऊ शकता असेही सांगण्यात आले. परंतु आम्हाला 'अस्थी नको' असे नातेवाईकांने सांगितले. त्यामुळे कोरोनाची दहशत लोकांच्या मनावर खोलवर रुजली असल्याचे पाहायला मिळाले. अनेक ठिकाणी कोरोनाबाधित रुग्णांना समाजाकडून चांगली वागणूक मिळत नसल्याच्या अनेक उदाहरणे डोळ्यासमोर आहेत.
तसंच दुसरीकडे माणुसकी जिवंत असल्याचे अनेक उदाहरणे पाहायला मिळत आहेत. काही ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते पीपीई किट घालून अंत्यसंस्कार करत असल्याच्या घटना राज्यांमध्ये घडत आहेत. काही ठिकाणी तर मृतदेह नाकारल्याने व स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यास मज्जाव केल्याने मुस्लिम समाजातील लोकांनी जाती धर्माच्या पलीकडे जाऊन माणुसकी दाखविली असल्याचे अनेक उदाहरणे या विविध भागात घडली आहेत.
'विजय' नावावरून झाला घोळ, आमदाराच्या कर्मचाऱ्याला केले मृत घोषित
लोकं कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून पुढे येत नाही. अशा परिस्थितीमध्ये फ्रंट लाईन कोरोना वॉरिअर्स आपला जीव धोक्यात घालून काम करत आहेत. परंतु कालपर्यंत आपल्या नात्यातली रक्ताची मंडळीसोबत असणारी काही मंडळी मात्र, कोरोना झालेल्या व्यक्तीपासून दुरावा घेत असल्याचे समाजात अनेक उदाहरण आपल्याला पाहायला मिळत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.